आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजमध्ये लेक्चर देताना तो करायचा असे काही; कोर्टाने धरले दोषी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नर्सिंग कॉलेजच्या वर्गात लेक्चर देताना वारंवार 'सेक्स' शब्दाचा उल्लेख करणाऱ्या  प्राध्यापकाला कोर्टाने दोषी ठरवले आहे. या प्राध्यापकाने विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

 

 

हा प्राध्यापक हनीमून, लग्नाच्या पहिल्या रात्री काय अपेक्षित आहे अशा विषयांवर चर्चा करायचा. रमेश बांद्रे हा प्राध्यापक मेडिकल सर्जिकल पार्ट 1 हा विषय सोडून अन्य विषयांवर चर्चा करायचा. प्राध्यापकाच्या या वर्तनाविरोधात नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने तक्रार केली. रमेश बांद्रेने त्याचे लैंगिक अनुभव लिहिलेली पर्सनल डायरी वाचण्यासाठी दिली होती असा आरोप एका विद्यार्थीनीने केला होता.

 

 

बांद्रेचे पीएचडी पर्यंतच शिक्षण लक्षात घेऊन कोर्टाने त्याची प्रोबेशनवर सुटका करण्याची परवानगी दिली आहे. बांद्रेवर ज्या कलमाखाली गुन्हा दाखल आहे त्यासाठी आधी एकवर्षाची शिक्षा होती. आता कायद्यातील दुरुस्तीनंतर दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 16 जून 2012 रोजी रमेश बांद्रेविरोधात गुन्हा दाखल झाला. एका विद्यार्थीनीने त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. सेक्सची शिकवणी विषयाशी संबंधित नाही असे अनेकदा त्याला विद्यार्थींनीने सांगितले तरीही तो सतत सेक्सवर घसरायचा. त्यामुळे त्याच्या विरोधात विद्यार्थीनीने तक्रार दाखल केली. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...