आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यात काळी गुढी उभारुन आंदोलन; वेतन रखडवल्याचा अनोख्या पद्धतीने निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखडवल्याचा निषेध अनोख्या पद्धतीने करण्यात आला. तब्बल 27 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखवडणाऱ्या शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्र्यांच्या बंगल्यात घुसून काळी गुढी उभारली.

 


मुंबईतील 27 हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन रखवडल्याचा आरोप शिक्षक परिषदेचा आहे. याच प्रकरणी शिक्षण विभागाचा निषेध करण्यासाठी आज सकाळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या बंगल्यात घुसून काळी गुढी उभारली. शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शिक्षक परिषदेचे पदाधिकारी सुभाष अंभोरे, बी डी घेरडे, प्रा. नरेंद्र पाठक व अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते. विनोद तावडे यांच्या बंगल्यात घुसून मुख्य दरवाज्यात काळी गुढी उभारून आपला निषेध व्यक्त केला आणि तावडेंकडे काळी गुढी सुपूर्द केली.

बातम्या आणखी आहेत...