आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावनिहाय नुकसानीचे अाकडे तातडीने द्यावेत; कृषी मंत्री फुंडकरांनी दिले जिल्हा प्रशासनाला अादेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग, धुळे या भागात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी बांधवांचे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने करावेत. जिल्हा प्रशासनाने सोमवारी विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी त्यांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी रविवारी दिले आहेत.


फुंडकर यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून शेतीच्या नुकसानाबाबत चर्चा केली. रब्बी पिकाचे व काढणी पश्चात मळणीसाठी ठेवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे, त्याबाबत माहिती त्वरित विमा कंपन्यांना कळवावी. यासाठी अधिकाऱ्यांनी साेमवारी संबंधित विमा कंपन्यांची बैठक घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.


मदतीचा प्रस्ताव पाठवा
पुढील दोन ते तीन दिवसातील माहितीही इमेल द्वारे देण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून संबंधित विमा कंपनीला बाधित शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध करून देत येईल. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे तलाठी, ग्रामसेवक, सहायक कृषी अधिकारी यांनी देखील पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर करून मदतीबाबत प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करावा, अशा सुचना कृषिमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...