आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे- मुंबईतील हिरानंदानी बिल्डर्सकडे २० काेटींची खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे जिल्हा परिषदेच्या एका सदस्याला पवई पाेलिसांनी अटक केली अाहे. गुलाब पारखे (जुन्नर, पुणे) असे अाराेपीचे नाव असून ताे जुन्नर परिसरातील शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा सदस्य अाहे.
याप्रकरणी हिरानंदानी गार्डन पवई कम्युनिटी प्रा. लि. यांच्या वतीने अर्जुन महादेव धायतडके (४४, कल्याण, ठाणे) यांनी तक्रार दिली अाहे. गुलाब पारखे हा हिरानंदानी कंपनीत २७ वर्षे लायजिंग अाॅफिसर म्हणून काम करत हाेता. नाेव्हेंबर २०१६ मध्ये त्याने कंपनीचा राजीनामा देऊन नाेकरी साेडली. त्यानंतर शिवसेना पक्षात प्रवेश करून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून अालेला अाहे. त्यानंतर माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती घेत हिरानंदानी कंपनीतर्फे पवई भागात सुरू असलेल्या विविध इमारतींच्या कामाबाबत हरकत घेतली. त्याने बृहन्मुंबर्इ महानगरपालिका व नगर भूमापन विभागात कंपनीविरुद्ध तक्रार अर्ज दिले.
बांधकामाबाबत हरकत घेतल्याने हिरानंदानी बिल्डर्स यांचे प्रकल्प लांबणीवर पडू लागले. याबाबत कंपनीने त्यांच्याशी संपर्क करून हरकतींविषयी विचारणा केली. दरम्यान, विविध ठिकाणी केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी नाेव्हेंबर २०१७ मध्ये त्याने २० काेटी रुपये खंडणीची मागणी केली. ही रक्कम जास्त असल्याने तडजाेडीअंती कंपनीतर्फे त्याला ६ कोटी रुपये देण्याचे ठरले. याचा १० लाख रुपयांचा पहिला हप्ता जानेवारी २०१८ मध्ये गुलाबला देण्यात अाला.
कंपनीकडून अाराेपीचे संभाषण रेकाॅर्ड
दरम्यानच्या काळात कंपनीतर्फे गुलाब पारखे याचे सर्व फाेन काॅल्स रेकाॅर्ड करण्यात अाले. १४ मार्च राेजी कंपनीकडून त्याला एक काेटी रुपये घेण्यासाठी बोलावण्यात आले आणि त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पाेलिस निरीक्षक अनिल पाेफळे यांच्या पथकाने सापळा रचून अाराेपीस मुलुंड पश्चिम येथील एका हाॅटेलमध्ये एक काेटी रुपये स्वीकारत असताना त्याच्या वाहनाच्या चालकासह रंगेहाथ पकडले. पोलिसांनी पारखेची कारही जप्त केली आहे.
पुढे स्लाईडद्वारे वाचा, पूर्वी याच बिल्डकरकडे नोकरीला होता गुलाब पारखे.....
बिल्डरचे काळे धंदे माहित असल्याने पारखेची डेरिंग......
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.