आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधन दरवाढीतून गरीब जनतेचा पैसा देशातील श्रीमंतांच्या खिशात- राहूल गांधी यांची टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मोदी सरकार श्रीमंतांसाठी काम करत आहे. वाढलेल्या इंधन दरातील पैसा हा थेट देशातील श्रीमंत लोकांच्या खिशात जात आहे, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. दरम्यान, आज (बुधवारी) सकाळी मुंबई येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर टाकास्त्र सोडले. सरकार गरीब जनतेचा पैसा घेऊन श्रीमंतांचे कर्ज माफ करत आहे. मोदी सरकारने इंधन दर वाढवले, या वाढलेल्या दरातून गरीब जनतेचा पैसा देशातील 15 ते 20 श्रीमंत लोकांच्या खिशात जात आहे, असा आरोप राहूल यांनी केला. आम्ही पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत आहोत, परंतु त्यांना यात काहीही रस नाही. देशातील सर्व संस्था ताब्यात घेण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. परंतु, आता मोदी आणि संघाविरोधात देशातील विरोधक एकवटले आहे,  असे राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले. अवघ्या दोन मिनिटांत त्यांनी पत्रकार परिषद संपवली. 

 

राहुल गांधी आज चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच, येथील एचएमटी धान्याचे निर्माते आणि दिवंगत कृषी शास्त्रज्ञ दादाजी खोबरागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबाला भेट देणार आहेत.

 

कोण आहेत दादाजी खोबराकडे...?

एचएमटी’सह तांदळाचे विविध वाण शोधणारे कृषिभूषण दादाजी खोब्रागडे (७६) यांचे 3 जून 2018 रोजी दीर्घ अाजाराने निधन झाले. त्यांनी आपल्या कोणत्याही शोधाचे आणि निर्मितीचे कधीच पेटन्ट बनवले नाही. खोबरागडे यांनी लावलेले शोध मोफत शेतकऱ्यांना वितरित केले. ते काही दिवसांपासून पक्षाघाताने आजारी हाेते. त्यांच्यावर गडचिराेलीत ‘सर्च’ रुग्णालयात उपचार सुरू हाेते. नागभिड तालुक्यातील नांदेड (जि. चंद्रपूर) हे त्यांचे मुळ गाव होते. 

 

अार्थिक परिस्थितीमुळे त्यांना उपचाराचा खर्चही पेलवत नव्हता. याबाबत माहिती कळाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून २ लाखांची मदत उपचारासाठी उपलब्ध करून दिली हाेती. केवळ तिसरीपर्यंत शिकलेल्या खाेब्रागडेंना संशाेधनासाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.


मुलाच्या आजारपणात विकावी लागली शेती
मधल्या काळात मुलाच्या आजारपणात दादाजी यांना त्यांची चार एकर शेती विकावी लागली. त्यामुळे ते मुलीच्या दीड एकर शेतीत वाण विकसित करण्याचे प्रयोग करीत असत. ते एवढे वाण विकसित केले तरी रोज मजुरी करून उदरनिर्वाह चालवत होते आणि हंगामाच्या काळात संशोधन करायचे.

बातम्या आणखी आहेत...