आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे गेली खडड्यात, शिवसेना खासदारांसमोर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे वक्तव्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रेल्वेतील संतप्त अॅप्रेंटिस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी मंगळवारी मुंबईत रेलरोको करत साडेतीन तास आंदोलन केले. यानंतर प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसंदर्भात संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीत असलेल्या शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची तत्काळ भेट घेतली. यावेळी गोयल यांनी गप्पांच्या ओघात मनसे खडड्यात गेली, असे वक्तव्य केले. मात्र, त्यावेळी तेथे मिडियाचे प्रतिनिधी आहेत प्रथम लक्षात आले नाही मात्र, ती गोष्ट लक्षात येताच त्यांनी अरे त्यांना बाहेर जायला सांगा, असे सांगत गप्प झाले. मात्र, तोपर्यंत त्यांच्या तोंडातून गेलेले शब्द कॅमे-यात कैद झाले होते. दरम्यान, याबाबत मनसे काय प्रत्त्युत्तर देते हे पहावे लागेल. 

 

हजारो अप्रेंटिस विद्यार्थ्यांनी मुंबईची लाईफलाईन लोकल रेल्वे तीन तास रोखून धरत आंदोलन केले. मुंबईत हे आंदोलन सुरू असतानाच शिवसेना खासदारांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची लागलीच भेट घेतली आणि रेल्वे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनासंदर्भातील एक निवेदन दिले. मुंबईत मंगळवारी कामावर निघालेल्या प्रवाशांना रेल्वे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी केलेल्या रेलरोको आंदोलनाचा फटका बसला. यामुळे रेल्वेचे वेळापत्रक बिघडले. मात्र त्याचवेळी प्रशिक्षणार्थींचा असंतोष ही लक्षात घेण्यासारखा आहे. या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी रेल्वेत तीन वर्ष अॅप्रेंटीस केली आहे. त्यांच्याकडे रेल्वेत आवश्यक असलेल्या कामातील कौशल्य आहे. देशपातळीवर विचार करता रेल्वेत 90 हजार जागा आहेत. तेव्हा केवळ 20 टक्के प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना सेवेत घेण्याचा नियम रद्द करून त्याऐवजी सर्वच प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना सेवेत घेण्यात यावे अशी मागणी शिवसेना खासदारांनी केली. यावर पीयुष गोयल यांनी सकारात्मक व योग्य निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्याचवेळी शिवसेनेच्या खासदारांशी बोलताना गोयल यांनी मनसे गेली खडड्यात असे वक्तव्य केले.

 

मनसेचे नेते उद्या गोयल यांच्या भेटीला-

 

दरम्यान, अप्रेंटिस विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मनसेचे दोन नेते उद्या रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या भेटीला जाणार आहेत. त्यावेळी मनसे काही प्रत्त्युत्तर देते का ते पाहावे लागेल. राज ठाकरे यांनी हजारो अप्रेंटिस विद्यार्थ्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे व तुमच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, शिवसेनेने रेल्वेमंत्र्यांना दिलेले निवेदन व फोटोज....

बातम्या आणखी आहेत...