आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-यांच्या संघर्ष मोर्चाला राज ठाकरेंचा 'मनसे' पाठिंबा, केली चहा-पाण्याची सोय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने शेतकरी व आदिवासींचा नाशिक येथून काढलेला लाँग मार्च आज मुंबईत दाखल झाला. शनिवारी रात्री ठाण्यात मुक्काम केल्यानंतर 35 हजार शेतक-यांसह किसान मोर्चाने मुंबईत प्रवेश केला आहे. किसान मोर्चा आज मुंबईत मुक्काम ठोकेल तर सोमवारी सकाळी विधान भवनाला घेराव घालणार आहे. 

 

दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे हे किसान सभेच्या मोर्चात सहभागी झालेल्या शेतक-यांची भेट घेण्यासाठी चुनाभट्टी-सायन येथील सोमैय्या मैदानावर थोड्याच वेळात दाखल होत आहेत. राज ठाकरे यांच्या मनसेने शेतक-याच्या संघर्षाला मनापासून पाठिंबा दिला आहे.

 

मुंबईसह ठाण्यात आंदोलक शेतकरी पोहचताच त्यांच्यासाठी चहा-नाश्ता व पाण्याची सोय केली. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फे शेतकरी मोर्चाला आलेल्या सुमारे 35000 शेतकरी बांधव भगिनींसाठी पाणी व काही खाद्य पदार्थांची सोय करण्यात आली. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...