आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परप्रांतीयांना जागा देण्यासाठी मराठी माणसाला घराबाहेर काढण्याचे काम सुरू-राज ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांची रविवारी सायंकाळी वांद्र्यात सभा झाली. याठिकाणी शासकीय वसाहतीमधील कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांच्याशी राज ठाकरे यांनी सभेच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांना जागा देण्यासाठी मराठी माणसाला घराबाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले. सरकारची हिम्मत असेल तर येथील सरकारी वसाहतींना हात लावून दाखवा, असा थेट इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला. 


मुंबईत ज्या नव्या वसाहती उभ्या केल्या जात आहेत, त्यातून मराठी माणूस हद्दपार केला जात असल्याचे राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा झोपडपट्ट्यांवरून टीका केली. झोपडपट्ट्या आपोआप उभारल्या जात नाहीत. त्या ठरवून उभ्या केल्या जातात. 


मराठी माणसाला हळू हळू मुंबईतून बाहेर काढायचे आणि नंतर मुंबई या ना त्या प्रकारे गुजरातशी जोडायची. बुलेट ट्रेन आणि मुंबई बडोदा एक्सप्रेस वे हे त्यासाठीचेच प्रयत्न असल्याचे यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...