आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'स्वाभिमान विरुद्ध स्वाभिमान\' व्यंगचित्रातून राज ठाकरेंचा शिवसेना, उद्धव ठाकरेंवर निशाणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेवर व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे नाराज असलेल्या चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपीने सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. केंद्रातल्या मोदी सरकारमधल्या टीडीपीच्या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. टीडीपीच्या मंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून यावर भाष्य केले आहे.

 

 

'स्वाभिमान विरुद्ध स्वाभिमान' असे व्यंगचित्र राज ठाकरेंनी काढले आहे. 'यात कसला मर्दपणा? त्यांना म्हणावे हिंमत असेल तर सरकारमध्ये राहून, अपमान गिळून वर सरकारला धमक्या देऊन दाखवा!' असे उद्धव ठाकरे संजय राउत यांना सांगत असल्याचे राज ठाकरेंनी या व्यंगचित्रामध्ये दाखवले आहे.

बातम्या आणखी आहेत...