आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंचा 50 वा वाढदिवस कुटुंबांसह साजरा, भावी सून मितालीची उपस्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज ठाकरे यांचा 50 वा वाढदिवस कुटुंबियांनी गुरूवारी मध्यरात्री 12 वाजता केक कापून साजरा केला. - Divya Marathi
राज ठाकरे यांचा 50 वा वाढदिवस कुटुंबियांनी गुरूवारी मध्यरात्री 12 वाजता केक कापून साजरा केला.

मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त कुटुंबियांनी गुरूवारी मध्यरात्री 12 वाजता केक कापून राज यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी राज यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, मुलगा अमित व त्याची भावी पत्नी मिताली आदी घरातील सर्व सदस्य उपस्थित होते. राज ठाकरे यांचा जन्म 14 जून 1968 रोजी मुंबईत झाला. आज त्यांनी पन्नाशी पूर्ण केली. 

 

राज यांचा मुलगा अमित यांचा गेल्यावर्षी मिताली बोरूडे या मैत्रिणीशी साखरपुडा झाला होता. राज यांच्या वाढदिवसाला तिचीही उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. 


श्वास महाराष्ट्र, ध्यास नव-महाराष्ट्र असलेल्या आमच्या नेत्याला, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वयाचा सुवर्णमहोत्सवी टप्पा तुम्ही पार केलात. महाराष्ट्रात लवकरात लवकर 'सुवर्णराज' अवतरू दे, हीच इच्छा, अशा शब्दांत मनसैनिकांनी राज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, कसा साजरा झाला राज यांचा वाढदिवस... 

बातम्या आणखी आहेत...