आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज ठाकरेंच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत 4 ते 9 रूपये पेट्रोल स्वस्त, मनसेचा उपक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त मनसेकडून अनोखं पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. राज यांच्या ढदिवसानिमित्ताचं औचित्य साधत राज्यभर विविध ठिकाणी 4 ते 9 रूपयापर्यंत पेट्रोल-डिझेलवर सवलत दिली जात आहे. मुंबईतल्या 36 पेट्रोल पंपांवर दुचाकी चालकांना पेट्रोल-डिझेल वर 4 रुपये सवलत देण्यात येत आहे. 

 

याद्वारे मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भाजप सरकार विरोधात अभिनव आंदोलन करायचे ठरवले आहे. राज ठाकरे यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा उपक्रम डिझेल पेट्रोलचे दर गगनाला भिडले असताना मनसेकडून भाजप सरकार विरोधात आंदोलनाची ही वेगळी पद्धत शोधून काढण्यात आली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना पेट्रोलचे दर कमी करण्यात सरकारला अपयश येत असल्याची टीका यावेळी मनसेकडून करण्यात आली आहे.

 

दरम्यान, आज सकाळपासूनच मनसे कार्यकर्त्यांची मुंबईतील राज यांच्या 'कृष्णकूंज'वर रांग लावली आहे. मुंबईसह राज्यातील कानाकोप-यात मनसे कार्यकर्ते राज यांच्या भेटीला पोहचत आहेत. नाणार, ईव्हीएम आदी वादग्रस्त विषयांवरील प्रतिकृतीचे केक कार्यकर्त्यांनी आणले. राज यांनीही कार्यकर्त्यांना नाराज न करता सर्वांसोबत केक कापून वाढदिवस साजरा केला. तसेच कृष्णकूंजबाहेर ढोल-ताशांच्या गजरात राज यांना मानवंदना दिली. राज यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी हत्तीवरून साखर वाटप केली. तर मुंबईतील 36 पेट्रोलपंपासह राज्यभरात विविध ठिकाणी नागरिकांना पेट्रोल-डिझेल 4 रूपये स्वस्त देण्यात येत आहे. 

 

राज ठाकरे यांचा 50 वा वाढदिवस कुटुंबियांनी गुरूवारी मध्यरात्री 12 वाजता केक कापून साजरा केला. यावेळी राज यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, मुलगा अमित व त्याची भावी पत्नी मिताली आदी घरातील सर्व सदस्य उपस्थित होते. राज यांचा मुलगा अमित यांचा गेल्यावर्षी मिताली बोरूडे या मैत्रिणीशी साखरपुडा झाला होता. राज यांच्या वाढदिवसाला तिचीही उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. राज ठाकरे यांचा जन्म 14 जून 1968 रोजी मुंबईत झाला. आज त्यांनी पन्नाशी पूर्ण केली. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, राज यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेने स्वस्त पेट्रोल उपक्रमांच्या कशी होती जाहिरात.... 

बातम्या आणखी आहेत...