आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- शहाजीराजे भोसले यांची आज (18 मार्च) 424 वी जयंती आहे. मागील 15-16 वर्षांपासून शहाजीराजेंची जयंती औरंगाबादमधील वेरूळमध्ये साजरी करण्यात येते. शहाजीराजेंची जयंती साजरी करण्यासाठी उत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे. शहाजीराजे भोसले यांचे वेरूळ येथे स्मारक व्हावे यासाठी 200 एकर जमिनीची मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 व्या शतकात ज्या बलाढ्य निझामांना पराभूत करून जे हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्याचे उद्गगाते खरं तर त्यांचे पिता शहाजीराजे भोसले हे होते. त्यामुळेच त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते. शहाजीराजांनी शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी जी मदत केली ती फार मोलाची होती. महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करण्याची संकल्पना शहाजीराजांनीच शिवरायांना दिली होती. शिवरायांनी आपल्या वडिलांच्या आदर्शाचा धडा संपूर्ण जगाला घालून दिला. छत्रपतींच्या वंशजाची सुरुवात वेरूळमधून....
- वेरूळ या ऐतिहासिक गावाचा लौकिक हा की छत्रपतींच्या वंशजाची सुरुवात येथून झालेली आहे. वेरूळने संपूर्ण महाराष्ट्र राज्य घडवले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.
- वेरूळ गावाची पाटीलकी बाबाजींकडे होती. बाबाजी भोसलेंना दोन मुले, मालोजी आणि विठोजी. मालोजी हे थोरले तर विठोजी धाकटे पुत्र होते.
- मालोजी आणि विठोजी दोघेही कर्तबगार लढवय्ये होते. त्यांच्या पदरी अनेक सरदार आणि हत्यारबंद मराठा सैन्य होते.
- हा काळच लढायांचा होता. निझामशाहीवर उत्तरेच्या मोगल बादशहाने स्वारी केलेली होती. दौलताबाद निझामशहाची राजधानी होती.
- मलिक अंबर हा त्यांचा वजीर होता. त्याने दौलताबादजवळील वेरूळच्या भोसले बंधूची कर्तबगारी पाहिली. त्याने निझामशहाजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणणी केली होती.
- पुढे मालोजीचा विवाह फलटणच्या वणगोजी निंबाळकरांच्या कन्या दीपाबाई यांच्यासोबत झाला.
- या जोडप्याला 18 मार्च 1594 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरूळ येथे मुलगा झाला ज्याचे नाव शहाजीराजे ठेवण्यात आले. जो पुढे स्वराज्य संकल्पक ठरला.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, शहाजीराजेंची कारकिर्द कशी होती, पुत्र शिवरायांना कसे घडविले व त्यांचा मृत्यू कसा झाला.....
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.