आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांतचा जावई धनुषने गायले मराठी गाणे; रजनीकांत यांचेही ‘पसायदान’ चित्रपटातून मराठीत पदार्पण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सुपरस्टार रजनीकांत एकीकडे “पसायदान’ चित्रपटातून मराठीत प्रवेश करत असतानाच त्याचा जावई धनुषने एका मराठी चित्रपटासाठी मराठीत गाणे गाऊन रजनीकांतच्या अगोदर मराठीत गायक म्हणून प्रवेश केला आहे. मंगेश कागणे यांनी लिहिलेल्या आणि प्रख्यात संगीतकार इलयाराजा यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे धनुषने तामिळनाडूत रेकॉर्डिंग केले.   


काही वर्षांपूर्वी धनुषने व्हाय दिस कोलावरी गाणे गायले होते. हे गाणे संपूर्ण देशात प्रचंड लोकप्रिय झाले होते. यूट्यूबवर सगळ्यात जास्त हिट या गाण्याला मिळाल्या होत्या. धनुषने तामीळ आणि तेलुगु भाषेतही गाणी गायली आहेत. परंतु मराठीत तो कधी गाणे गाऊ शकेल, असे वाटले नव्हते. परंतु रजनीकांत आणि मामुटी यांना घेऊन पसायदान या मराठी चित्रपटाची निर्मिती करणारे बाळकृष्ण सुर्वे यांनी मदत केल्याने धनुष मराठी चित्रपट फ्लिकरसाठी मराठी गाणे गाण्यास तयार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.  महक फिल्म्स आणि सरल चित्र फ्लिकर नावाच्या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचे निर्माते राज सरकार आणि हरीश पाटील असून दिग्दर्शक अमोल पाडावे आहेत. नवा चेहरा राजवीर सरकार मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. चित्रपटाला संगीत इलयाराजा यांनी दिले असून संगीतकार म्हणून हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. एक प्रियकर आपल्या प्रेयसीसाठी गाणे गातो असे दृश्य चित्रपटात आहे. “तुला पाहिल्यानंतर मला आता काहीही नको, माझी तहान-भूक हरली’ अशा अर्थाचे हे गाणे असून ‘मला दारू नको, पाणी नको’ असे गाण्याचे बोल आहेत.   

 

मराठीचे घेतले प्रशिक्षण  
धनुष हे गाणे गाणार असल्याने गाण्याचे शब्द सोपे ठेवण्यात आले. तसेच धनुषने यासाठी मराठी भाषेतील उच्चारांचे थोडे दिवस प्रशिक्षण घेतले. दोन दिवस तो गाण्याची प्रॅक्टिस करत होता. तसेच पाच तास रियाजही केला आणि त्यानंतर गाणे गायले. हे गाणेही व्हाय दिस कोलावरीप्रमाणे हिट होईल, अशी अपेक्षा चित्रपटाच्या निर्मात्यांनी व्यक्त केली.

 

बातम्या आणखी आहेत...