आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपला युतीची आठवण होऊ लागली आहे. पण, आमच्या टेकूवर सत्ता उपभोगत असतानाही तुम्ही आम्हाला जी वागणूक दिलीय, ती कधीच विसरणार नाही. आम्ही एकटे लढू आणि विधानसभेवर भगवा फडकवू, असे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी म्हटले आहे.
भाजप-शिवसेनेची पुन्हा युती होईल आणि आम्ही सत्तेवर येऊ, असे विधान राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळात केले. त्याचा रामदास कदम यांनी समाचार घेतला. तुमच्या डोक्यात जे शिजतंय, ते काढून टाका. युती करायची की नाही, याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेणार आहेत आणि त्यांनी आधीच स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे कदम यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.