आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील चार लाख खासगी रिक्षा नियमित करणार : दिवाकर रावते यांचे अाश्वासन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात चार लाख बेकायदेशीर खासगी रिक्षा असून त्या नियमित करण्यासाठी राज्य सरकारने मार्च अखेरपर्यंत मुदत दिली अाहे. गरज पडल्यास ती अजून वाढवली जाईल, असे अाश्वासन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले. मुंबईतील ३२ हजार टॅक्सी रिक्षा चालकांवर ३ महिन्यांत कारवाई केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  


 मुंबईत दिवसेंदिवस रिक्षा-टॅक्सींची संख्या वाढत अाहे. चालकांची पश्चिम उपनगरात मुजाेरी वाढली असून रेल्वे स्थानकाबाहेर मार्ग अडवून धरून मनाला येईल त्या मार्गाचे भाडे स्वीकारणे, प्रवाशांची वाद घालणे त्याचबराेबर मीटर फास्ट करणे, रिक्षा चालकांकडे बॅच परवाना नसणे अादी मुद्दे उपस्थित करून यावर सरकारने काय कारवाई केली, असा प्रश्न अानंद ठाकूर यांनी विचारला. यावर  परिवहन मंत्री म्हणाले.  रिक्षा व टॅक्सी चालकांसंदर्भातील तक्रार देण्यासाठी टाेलफ्री क्रमांक दिला असून तो रिक्षा व टॅक्सीवर लावणे बंधनकारक करण्याचा परिवहन खाते विचार करत अाहे. परिवहन विभागात ४० टक्के पदे रिक्त अाहेत. सुमारे १ हजार पदे भरायची अाहेत. परंतु, यासंदर्भात एकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने ही बाब न्यायप्रविष्ट असल्याचे परिवहन मंत्री रावते यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...