आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • संघाच्या बदनामीच्या खटल्यात राहुल गांधी भिवंडी कोर्टात Rahul Gandhi In Mumbai

राहुल गांधींवर भिवंडीच्या न्यायालयात आरोप निश्चित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिवंडीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चक्क अाॅटाेरिक्षात बसून पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, संवाद साधला. - Divya Marathi
भिवंडीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चक्क अाॅटाेरिक्षात बसून पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या, संवाद साधला.

मुंबई - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या आरोपप्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मंगळवारी भिवंडी न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले. राहुल यांनी मात्र हे सर्व अाराेप  फेटाळत आपण निर्दोष असल्याचे सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी हाेईल.


मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने राहुल यांना व्यक्तिश

हजर राहण्याचे अादेश दिले हाेते. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता ते भिवंडी न्यायालयात हजर राहिले.  काँग्रेस नेते अशोक गेहलोत, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह काही प्रमुख नेते त्यांच्यासाेबत हाेते. या वेळी न्यायालय परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. 


मी निर्दोष... : भादंवि कलम ४९९ आणि ५०० नुसार राहुल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर राहुल यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगत लावण्यात आलेले आरोप अमान्य असल्याचे न्यायालयात सांगितले. नंतर काेर्टाबाहेर पत्रकारांशी बाेलताना ‘विचारांच्या मुद्द्यावर माझी लढाई सुरू राहील, ती आम्ही जिंकूही,’ असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला. 

 

अाराेप सिद्ध झाल्यास दाेन वर्षांपर्यंत तुरुंगवास

भिवंडीच्या न्यायालयाने राहुल गांधींविराेधात भादंवि कलम ४९९ (मानहानी) व ५०० (मानहानीसाठी शिक्षा) नुसार अाराेप निश्चित केले अाहेत. कलम ५०० अंतर्गत ते दाेषी सिद्ध झाल्यास त्यांना दाेन वर्षाचा तुरुंगवास किंवा दंड किंवा एकाच वेळी दाेन्हीही शिक्षा हाेऊ शकतात.

 

काय आहे प्रकरण ? 
महात्मा गांधी यांची हत्या संघानेच घडवून आणली, असे विधान राहुल यांनी ६ मार्च २०१४ रोजी भिवंडी येथे लाेकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत केले हाेते. त्यावर अाक्षेप घेत संघाचे शहर-जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी राहुल यांच्याविराेधात अवमान याचिका दाखल केली होती.

 

पुढील स्लाईडवर पहा, संबंधित छायाचित्र आणि व्हिडीओ...  

बातम्या आणखी आहेत...