आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RSS प्रणित संघटनेकडून मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊसवर 4 जूनला इफ्तार पार्टीचे आयोजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी (4 जून) रोजी मुंबईतील सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. - Divya Marathi
सोमवारी (4 जून) रोजी मुंबईतील सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे.

मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची उपसंघटना 'राष्ट्रीय मुस्लिम मंच'ने येत्या सोमवारी (4 जून) रोजी मुंबईतील  सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात रमजाननिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. या इफ्तार पार्टीला संघाचे नेते व 'राष्ट्रीय मुस्लिम मंच' चे संस्थापक इंद्रेश कुमार उपस्थित राहणार असल्याचे कळते आहे. दरम्यान, सरकारी अतिथीगृहात प्रथमच एखाद्या धर्माच्या सणाचे/ इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या इफ्तार पार्टीत मुस्लिम देशातील राजदूत सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय मुस्लिम मंचचे राष्ट्रीय संयोजक विराग पचपोरे यांनी सांगितले की, "30 देशांतील काउंसिल जनरल, मुस्लिम समुदायातील 200 प्रमुख चेहरे आणि या समुदायातील आणखी 100 व्हीआयपी सदस्य यात सहभागी होतील.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2015 सालापासून अशा कार्यक्रम करण्यास सुरूवात केली आहे. याद्वारे संघ मुस्लिम समुदायातील आपली ऊठबस वाढवू इच्छित आहे. मात्र, मुस्लिम लोकसंख्या जास्त असेलल्या उत्तर भारतात असे कार्यक्रम पार पडत होते. मात्र, मुंबईत प्रथमच संघाने इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. याद्वारे संघ मुंबईसारख्या मेट्रो शहरातील मुस्लिम समुदायाला आपलेसे करण्याच्या प्रयत्नात आहे. उत्तर भारतानंतर संघाने पश्चिम-मध्य व दक्षिण भारतात मुस्लिमांपर्यंत जाण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

 

पचपोरे यांनी सांगितले की, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि येथे अनेक देशांची वाणिज्य दूतावास आहेत. हे शहर अशा काही मुस्लिम व्यापा-यांचे घर आहे ज्यांनी देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. असे अनेक मुस्लिम कलाकार सुद्धा आहेत जे इंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा मुख्य भाग आहेत. या इफ्तार पार्टीद्वारे आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा व वाढविण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा इफ्तार पार्टीचे आयोजन करून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाबाबत मुस्लिम समाजात जे गैरसमज पसरविण्यात आले आहेत ते दूर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

 

बातम्या आणखी आहेत...