आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानची अभिनेत्री हलाखीत; उपचार करायलाही पैसे नाहीत;सलमानकडून मदतीची अपेक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या ‘वीरगती’ चित्रपटातील अभिनेत्री पूजा डडवाल गंभीर आजारी असल्याच्या बातम्या येत आहेत. तिला टीबी आणि फुप्फुसांचा आजार झाला आहे. एकेकाळी सलमानसोबत रुपेरी पडदा गाजवणाऱ्या पूजाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. तिच्याकडे उपचारांसाठीही पैसे नाहीत. गेल्या १५ दिवसांपासून ती मुबईच्या शिवडी टीबी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. 


सूत्रांनुसार, पूजाला गेल्या ६ महिन्यांपासून टीबी झाला आहे. तिने मदतीसाठी सलमान खानशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला. मात्र, अद्याप तिचे बोलणे होऊ शकलेले नाही. दरम्यान, पूजाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर आता सलमान मदत करेल, अशी आशा पूजाला आहे. 


पूजा डडवालने ‘वीरगती’मध्ये सलमानसोबत काम केले आहे. शिवाय ‘हिन्दुस्तान’ आणि ‘सिन्दूर की सौगंध’सारख्या चित्रपटांतूनही ती चमकली होती.

 

घरच्यांनीही दूर लोटले 
पूजाच्या निकटवर्तीयांनुसार ती आजारी पडल्यानंतर तिचा पती आणि घरच्या लोकांनी तिला एकटे सोडले आहे. चांगले उपचार होत नसल्यामुळे तिची तब्येत वरचेवर बिघडत चालली आहे. 

बातम्या आणखी आहेत...