आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारामतीच्या विद्यापीठातून सतत नवीन प्रयोग सुरुच- शरद पवारांवर संभाजी भिंडेची टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- प्रतिमा मलिन केल्यानंतर अाता माझ्यावर अॅट्राॅसिटीचे गुन्हे दाखल आहेत. जीवनातून उठवण्यासाठीचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे. शरद पवारच हे सगळे घडवतात. बारामतीच्या विद्यापीठातून सतत नवीन प्रयाेग हाेत अाहेत, अशी टीका शिवप्रतिष्ठानचे संस्थापक तथा भीमा काेरेगाव प्रकरणामुळे राज्यभर चर्चेत अालेले संभाजी भिडे गुरुजी यांनी केली. 'दिव्य   मराठी' कार्यालयाला सोमवारी त्यांनी भेट दिली,त्यावेळी ते बाेलत हाेते. 

 

धुळे शहरात व्याख्यानासाठी अालेल्या संभाजी भिडे गुरुजी यांनी साेमवारी सकाळीच पांझरा काठावर तरुणांना बलाेपासनेचे धडे दिले. 

 

त्यानंतर विविध कार्यक्रमात व्यग्र असलेले भिडे गुरुजी यांनी सायंकाळी 'दिव्य मराठी'च्या कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी समाज व धर्मासाठी एकसंघ हाेण्याची गरज वर्तविली. देशाचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे अावाहनही त्यांनी केले. शरद पवार यांचे राजकीय स्थान डळमळीत झाले अाहे. त्यामुळे त्यांच्याकडून सतत नवीन प्रयाेग होत असतात. मराठा अारक्षण हा त्यातीलच एक प्रकार अाहे. शरद पवारांचे बारामती विद्यापीठ नवीन प्रयाेगांसाठी प्रसिद्ध अाहे. त्यांच्याकडून काही चांगले हाेईल, ही अपेक्षा नाही. 

 

काेरेगाव प्रकरणात त्यांनी सर्व बाजूंनी कसरती करून पाहिल्या मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सगळे प्रयत्न फाेल ठरवले, असेही संभाजी भिडे गुरुजी यांनी सांगितले. देशाचे भवितव्य तरुणांच्या हाती अाहे. त्यामुळे त्यांच्यातून उदयाेन्मुख नेतृत्व घडावे, याच अपेक्षेने राज्यभर काम करीत अाहे, असल्याचे ते म्हणाले. 

 

धुळ्यात भारिप कार्यकर्त्यांची सभेत घाेषणाबाजी-

 

भिडे गुरुजींची धुळे शहरातील सैनिक लान्समध्ये सायंकाळी व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्या वेळी अांबेडकरवादी तरुणांनी जोरदार घाेषणाबाजी केली. त्यामुळे काही प्रमाणात तणाव निर्माण झाला. मात्र पाेलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. दरम्यान संभाजी भिडे गुरुजी यांच्या दाैऱ्याची धडकी प्रशासनानेही घेतल्याचे साेमवारी दिसून अाले. मोठा पोलिस फौजफाटा यावेळी तैनात होता. 

बातम्या आणखी आहेत...