आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अांब्यामुळे अपत्यप्राप्ती..भिडे गुरुजींची चाैकशी सुरू; नाेटीस पाठवण्यासाठी \'पत्त्या\'ची अडचण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिडे यांच्या आंब्याच्या वक्तव्यावरून टीकेचे धनी ठरले आहेत. - Divya Marathi
भिडे यांच्या आंब्याच्या वक्तव्यावरून टीकेचे धनी ठरले आहेत.

नाशिक- 'शेतातील विशिष्ट अांबे खाल्यानंतर पुत्रप्राप्ती हाेते', या वादग्रस्त विधानावरून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविराेधात अाराेप-प्रत्याराेप सुरू असतानाच, अाता महापालिकेने अाराेग्य संचालनालयाच्या पत्रानुसार चाैकशी सुरू केली अाहे. त्यासाठी नाेटीस पाठवली जाणार असली तरी, भिडे गुरुजी नेमके राहतात काेठे याचाच पत्ता नसल्यामुळे काय करायचे असा पेच अाराेग्य विभागापुढे असल्याचे चित्र अाहे. 

 

रविवारी नाशिकमधील एका कार्यक्रमात भिडे यांनी माझ्या शेतातील आंबे खाणाऱ्या दाम्पत्याला मूल हाेत असल्याचे वक्तव्य केले हाेते. 180 पेक्षा जास्त लोकांना याचा अनुभव असून त्यापैकी 150 जणांना मुले झाल्याचाही त्यांचा दावा हाेता. 

 

राज्य शासनाच्या 'बेटी बचाव बेटी पढाव' या धाेरणाविराेधात हे वक्तव्य असल्यामुळे अाराेग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी त्याची गंभीर दखल घेतली. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी शासनाने महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या काेर्टात चेंडू टाेलवला अाहे. पालिकेने चाैकशीसाठी प्रक्रिया सुरू केली असून सभेला हजर लाेकांचे, अायाेजकांचे जाबजबाब, खुद्द भिडे यांचा जबाब, भाषणाचा व्हिडिअाे, अाॅडिअाे क्लिपही तपासली जाणार अाहे. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान कायद्याअंतर्गत ही चाैकशी पूर्ण करून 18 जूनला यासंदर्भात होणाऱ्या समितीच्या बैठकीत अहवाल सादर केला जाणार असल्याचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी स्पष्ट केले. 

 

पोलिस आयुक्तालयाची मदत-

 

भिडे यांना नाेटीस पाठवण्यात प्रमुख अडचण म्हणजे त्यांचा निवास किंवा कार्यालयाचा पत्ता माहिती नसल्यामुळे वैद्यकीय विभागापुढे नोटीस पाठवायची कुठे असा प्रश्न अाहे. अाता त्यासाठी पोलिस आयुक्तालयाची मदत घेतली जाणार अाहे. 

बातम्या आणखी आहेत...