आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या वक्तव्याने राज ठाकरे येऊ शकतात अडचणीत, सांगलीत BJP कार्यकर्त्याकडून तक्रार दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली- ‘येत्या काही महिन्यात देशात धार्मिक मुद्यावरुन दंगली होतील.’ या वक्तव्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, राज ठाकरेंचे हे वक्तव्य आक्षेपार्ह आहे. असे म्हणत सांगलीत भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रारही नोंदवली आहे.

 


राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा भाजप कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. भाषणादरम्यान आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा अशी तक्रारही भाजपच्या कार्यकर्त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात केली आहे.राज ठाकरे काय म्हणाले होते?
'पुढच्या काही महिन्यांत राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात हिंदू-मुस्लिम यांच्यात दंगली घडतील. तशी माहिती मला मिळाली आहे, राम मंदिर निश्चित झाले पाहिजे. पण निवडणुकांनंतर राम मंदिर व्हावे, भाजपने राजकारणासाठी त्याचा वापर करु नये,' असे राज ठाकरे म्हणाले होते. शिवाजी पार्कवरील भाषणात राज ठाकरेंनी भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली होती.

बातम्या आणखी आहेत...