आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बापटांच्या पुणेरीपणावर राऊतांचे शिक्कामोर्तब म्हणाले, पोटात होते ते ओठांवर आले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गिरीष बापट यांनी भाजपला अवाक् करणारे विधान केल्यावर त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना चांगलाच चिमटा काढला आहे. ‘गिरीश बापट अस्सल पुणेकर आहेत, जुने नेते आहेत ते कधीही खोटं बोलत नाही, त्यांच्या जे पोटात होते ते ओठांवर आले, अशा शब्दांत राऊतांनी हा चिमटा घेतला आहे.

 

 

हिंदुत्ववादी संघटनाबाबत म्हणाले...

हिंदुत्ववादी संघटनावर आरोप करणे चुकीचे आहे. महाराष्ट्र जातीपातीत फाटला जातोय हे धोकादायक आहे. कोरेगाव कोरेगाव प्रकरण हाताळण्यासाठी मुख्यमंत्री सक्षम आहेत, पंतप्रधान यांनी भाष्य करण्याची गरज नाही’, असेही ते म्हणाले. 

 

 

कृषीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प हवा

देशातले कृषीसंकट खूप मोठे असून दिवसाला 2 हजार शेतकरी संपत आहेत. त्यामुळे संसदेचे वीस दिवसांचे अधिवेशन बोलवावे अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केली. त्यांच्या या वक्तव्याचे स्वागत संजय राऊत यांनी केले. तसेच कृषी खात्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने स्वतंत्र बजेट सादर करावे, ही शिवसेनेची मागणी असल्याचेही म्हणाले. मुंबईत लोकसंख्येचा स्फोट झाला असून आगीच्या घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...