आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिग्गज कंपन्यांच्या विक्रीमुळे सेन्सेक्स 150 अंकांनी घसरला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंुबई- जागतिक स्तरावर शेअर बाजारातील तेजीमध्ये बँकिंग तसेच अन्य क्षेत्रातील बड्या कंपन्यांतील विक्रीमुळे गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजार जवळपास आठवडाभराच्या कनिष्ठ स्तरावर आला.  बीएसईचा सेन्सेक्स ०.४४ टक्के म्हणजे १५०.२० अंक घसरून ३३,६८५.५४ अंकांवर आला. राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ०.४९ टक्के म्हणजे ५०.७५ अंक घसरणीसह १०,३६०.१५ अंकांवर बंद झाला. हा दोन्हीचा ९ मार्चनंतरचा नीचांकी बंद स्तर आहे.  


सेन्सेक्स सलग तिसऱ्या दिवशी व निफ्टी दुसऱ्या दिवशी लाल निशाणीत बंद झाला. बाजारात एकूण गुंतवणूक धारणा बळकट राहिली. मात्र, बँकिंगसोबत रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा स्टील व आयटीसीसारख्या दिग्गज कंपन्यांतील विक्रीमुळे प्रमुख सूचकांक साधारण पूर्ण दिवस घसरलेल्या स्थितीत राहिले. सेन्सेक्समध्ये येस बँकेचे शेअर दोन टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्येही पावणे दोन टक्के घसरण राहिली.
 एशियन पेंट्सचे शेअर २ % वधारले. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घटल्यामुळे ऊर्जा, इंधन,गॅस समूहांचा सूचकांक १ टक्क्याने घसरला.  आशियाई बाजाराच्या संकेतांच्या बळावर सेन्सेक्स ३३,८४३.४७ अंकांवर खुला झाला निफ्टी ५.४५ अंक घसरून १०,४०५.४५ अंकांवर बंद झाला. 

बातम्या आणखी आहेत...