आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान झाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादीला करावी लागेल प्रत्येकी 3 मतांची ‘बेगमी’; 7 उमेदवारांचे अर्ज दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी साेमवारी मुंबईच्या विधानभवनात काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. - Divya Marathi
राज्यसभा निवडणुकीसाठी ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी साेमवारी मुंबईच्या विधानभवनात काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. तर स्वाभिमान महाराष्ट्र पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.

मुंबई- महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी भाजपने चार तर  शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक असे सात उमेदवार िरंगणात अाहेत. फक्त तीन उमेदवार जिंकून येण्याइतपत संख्याबळ असताना भाजपने विजया रहाटकर यांच्या रुपाने चाैथा उमेदवार दिल्यामुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. गुरुवारपर्यंत भाजपच्या चौथ्या उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्यास २३ मार्च रोजी मतदान घ्यावे लागेल, त्यात घाेडेबाजार हाेण्याची शक्यता अाहे.


राज्यसभेवर दर दोन वर्षांनी विधानसभेच्या सदस्यांद्वारे सहा खासदार निवडून दिले जातात.  या निवडणुकीत  प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी किमान ४२ मतांची आवश्यकता असते. काँग्रेसकडे कालपर्यंत ४२ आमदार होते.  मात्र ज्येष्ठ आमदार डॉ.  पतंगराव कदम यांचे नुकतेच निधन झाले. तर नितेश राणे, कालीदास कोळंबकर हे राणे समर्थक अामदार काँग्रेसला मदत करण्याबाबत साशंकात व्यक्त हाेत अाहे. त्यामुळे बिनविराेध निवडणूक न झाल्यास अापले उमेदवार कुमार केतकर यांच्यासाठी काँग्रेसला आणखी तीन मतांची बेगमी करावी लागेल.

 

केतकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित असलेले शेकापचे आमदार गणपतराव देशमुख आणि समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांची उपस्थिती त्यादृष्टीने सूचक मानली जाते. 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार वंदना चव्हाण अाहेत. त्यांच्या पक्षाचे विधानसभेत ४१ अामदार अाहेत. मात्र छगन भुजबळ आणि बंडखोर आमदार रमेश कदम हे दोघेही तुरुंगात आहेत. त्यांना मतदनाची परवानगी न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसलाही ‘४२’चा अाकडा गाठण्यासाठी तीन मतांची जुळवाजुळव करावी लागेल. याउलट शिवसेनेचे ६३ आमदार अाहेत. त्यांचे उमेदवार अनिल देसाई सहज विजयी हाेऊन ११ मते शिल्लक राहतील. ही शिल्लक मते कुणाच्या पारड्यात टाकणार याबद्दल उत्सुकता आहे.


विजया रहाटकर घेतील माघार ?
भाजपचे १२२ आमदार अाहेत. त्या अाधार भाजपचे उमेदवार प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन हे सहज विजयी हाेऊ शकतात. मात्र विजया रहाटकर या चाैथ्या उमेदवार रिंगणात राहिल्यास घाेडेबाजार अटळ अाहे. त्यांच्यासाठी भाजपला शिवसेनेची मदत घ्यावी लागेल. मात्र रहाटकर या अर्ज मागे घेऊन सहाही जागांसाठी निवडणूक बिनविराेध हाेईल, अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

बातम्या आणखी आहेत...