आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपशी युतीला शिवसेनेचा नकार; उद्याेगमंत्री सुभाष देसाई यांचे पक्ष मेळाव्यात स्पष्टीकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपने शिवसेनेसमोर पुन्हा एकदा युतीसाठी मैत्रीचा हात पुढे केला आहे. - Divya Marathi
भाजपने शिवसेनेसमोर पुन्हा एकदा युतीसाठी मैत्रीचा हात पुढे केला आहे.

मुंबई- भाजपच्या मुंबईतील महामेळाव्यात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेेनेसाेबत युती कायम ठेवण्याबाबत सूताेवाच केले हाेते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील या नेत्यांनीही शिवसेनेला गाेंजारण्याचा प्रयत्न केला हाेता. मात्र गेली चार वर्षे भाजपकडून दुय्यम वागणूक मिळालेली शिवसेना अाता त्यांच्याशी युती करण्यास राजी दिसत नाही. ‘गेली चार वर्षे शत-प्रतिशत भाजपची भाषा बोलणाऱ्यांचा आता आत्मविश्वास डळमळत अाहे, त्यामुळेच त्यांना मित्रपक्षाची अाठवण येत अाहे,’ असा टाेला शिवसेनेचे नेते व 

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी लगावला. इतकेच नव्हे तर शिवसेना स्वबळावरच महाराष्ट्रात भगवा फडकवणार, असा पुनरुच्चारही त्यांनी केला. नवी मुंबईच्या नेरुळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक केंद्रात शिवसेनेच्या मेळाव्यात देसाई यांनी भाजपच्या प्रस्तावावर टाेलेबाजी केली. या वेळी एकनाथ शिंदे, रामदास कदम, दीपक केसरकर, रवींद्र वायकर हे शिवसेेनेचे मंत्री,  खासदार राजन विचारे अादी उपस्थित हाेते. देसाई म्हणाले, ‘२०१९ मध्ये फक्त भाजपचे सरकार येणार, अशी ६ महिन्यांपूर्वी ‘त्यांची’ भाषा होती. शनिवारी त्यांना २०१९ मध्ये ‘एनडीए’चे सरकार येणार असे त्यांना सांगावे लागले. याचाच अर्थ भाजपचा आत्मविश्वास डळमळला आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार शिवसेना स्वबळावरच महाराष्ट्रात भगवा फडकवणार. शिवसैनिकांनी त्यासाठी कामाला लागावे,’ असे अावाहन देसाई यांनी केले. 


उद्धव ठाकरे नसल्याने मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम रद्द  
ठाण्यातील विविध २५ विकासकामांचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार होते. यानिमित्ताने भाजप शक्तिप्रदर्शनही करणार होते. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या परदेशात अाहेत व त्यांना विश्वासात न घेताच ठाणे महापालिका आयुक्त संजीव जायस्वाल यांनी हा कार्यक्रम ठरवल्याचे शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांना कळवण्यात अाले. त्यामुळे शिवसेनेची नाराजी नकाे म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम घेणेच टाळल्याची चर्चा अाहे. 


युती झाली तर भाजपची साथ साेडणार : राणे 
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती झाली तर मी भाजपसाेबत नसेन, असा इशारा भाजपच्या तिकिटावर नव्याने राज्यसभा खासदार झालेले नारायण राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बाेलताना दिला. ‘महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मला घेण्यास शिवसेनेचा अाक्षेप हाेता. मला मंत्रिपद दिले असते तर ते सत्तेतून बाहेर पडणार हाेते. त्यामुळे जर उद्या युती हाेणार असेल तर मी भाजपसाेबत राहण्यास काहीच अर्थ नाही’, असे राणेंनी स्पष्ट केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना हाच अामचा  खरा शत्रुपक्ष असेल, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...