आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- पाऊणशे वर्ष वयाेमान म्हणजे अायुष्याचा शेवटचा पाडाव. याचवेळी वाढत्या वयातील समस्या जाणवायला लागतात.मरणाचे नकारात्मक विचार मनात येऊ लागतात. मरण यायचे तेव्हा ते येणारच. उलट त्याची चिंता न करता त्याचा सामना अानंदी अाणि सकारात्मक वृत्तीने करण्याची गरज अाहे. वृध्दापकाळाची शिदाेरी तरुण वयातच गाठीशी बांधली, तर उतारवयात त्याचा फारसा त्रास जाणवणार नाही,असा सल्ला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी रविवारी शिवाजी मंदिर येथे माजी मुख्यमंत्री मनाेहर जाेशी यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी बाेलताना दिला.
माजी मुख्यमंत्री अाणि माजी लाेकसभा अध्यक्ष डाॅ. मनाेहर जाेशी यांच्या ‘अवघे पाऊणशे वयाेमान’ या १३ व्या पुस्तकाचा प्रकाशनसमारंभ रविवारी शिवाजी मंदिरात झाला. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, बिहार अाणि त्रिपुराचे माजी राज्यपाल डी. वाय. पाटील, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, मुंबईचे महापाैर विश्वनाथ महाडेश्वर अादी मान्यवर या वेळी उपस्थित हाेतेे. संसार करून मुंले माेठी झाली की वाढत्या वयाचे प्रश्न उद्भवू लागतात. कुटुंबात प्रेमाचे वातावरण नसेल तर जीवन नकाेसे वाटू लागते. परावलंबित्व नकाेसे वाटू लागते. पण म्हातारपणात देखील चांगले जगण्यासाठी मनाची वृत्ती अानंदी ठेवतानाच सामाजिक कार्य, छंद जाेपासणे गरजेचे अाहे. अाजच्या वयाेवृद्धांच्या समस्याच एक प्रकारे या पुस्तकातून व्यक्त झाल्या अाहेत. सरकारने देखील वयाेवृद्धांच्या समस्या साेडवण्याकडे लक्ष दिले पहिजे याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.
आढ्याकडे न पाहता काहीतरी करा : पवार-
शरद पवार म्हणाले की, ‘प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगूनही यश कसे मिळवता येते याचा अादर्श या पुस्तकातून घालून देण्यात अाला अाहे. अमूक क्षेत्र माझे नाही ही मानसिकता मनातून काढा. पाऊणशे वयाेमान झाले म्हणून अाढ्याकडे बघत बसू नका, काही तरी करा, असा सल्लाच मनोहर जोशींनी या पुस्तकातून दिला अाहे.’
निवृत्ती ही वृत्ती असते : उद्धव ठाकरे-
निवृत्ती ही वृत्ती असते. शिवराय, शाहू महाराज, ज्ञानेश्वर हे निवृत्त झालेच नाहीत. त्यांचे विचार अाजही शिकवण देतात. अापल्या कर्तृत्वाने अायुष्यात उत्तुंग शिखर गाठलेल्या व्यक्ती या या पुस्तकाच्या रूपाने एकत्र अाल्याचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या कार्यक्रमातील फोटोज....
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.