आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री ‘फितूर,’ तरी नाणार प्रकल्प होऊ देणार नाही : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कोकणातील नाणार प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांनी सौदी अरेबियाबरोबर करार केला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र मुख्यमंत्री फितूर झाले असल्याचे सांगत शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही, असे स्पष्ट केले.   


नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आणि स्वतः मुख्यमंत्र्यांकडे पत्र देऊन प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी विरोध पाहून निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले होते. परंतु बुधवारी सौदी अरेबियाबरोबर याबाबत करार करण्यात आला. परदेशात सुटीवर असलेल्या उद्धव यांना ही माहिती कळताच त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करत प्रकल्प होऊ दिला जाणार नाही, असे जाहीर केले आहे. ठाकरेंनी पत्रकात म्हटले, मुख्यमंत्रीही अखेर पिचक्या पाठकण्याचेच निघाले. नाणार प्रकल्प लादणार नाही, असे त्यांनी मला सांगितले असतानाही हा प्रकल्प लादला गेला. तरी, शिवसेना कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही. नाणारसारखा विनाशकारी प्रकल्प लादणार नाही. स्थानिकांचा विरोध असेल तर हा प्रकल्प कदापि कोकणच्या भूमीत येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊनही हा प्रकल्प लादला गेला.  

बातम्या आणखी आहेत...