आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने राहुल फाळकेच्या मुलांच्या शिक्षणाची व कुटुंबियाची जबाबदारी स्वीकारली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नोटाबंदी व जीएसटीला कंटाळून आत्महत्या केलेले शिवसैनिक राहुल फाळके यांच्या चार वर्षे मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली असून त्याची आर्थिक तरतूद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली असल्याची माहिती शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर यांनी त्याच्या कुटुंबीयाला दिली.

 

वनवासमाची (ता. कराड) येथील रहिवाशी व सोने चांदीचा व्यापारी, शिवसैनिक राहुल फाळके यांनी जीएसटी व नोटाबंदीमुळे व्यवसाय अडचणीत आल्यामुळे आत्महत्या केली आहे. शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने खासदार गजानन कीर्तिकर यांनी फाळके कुटुंबीयांचे सांत्वन केले. राहुल फाळके यांचे वडील राजाराम फाळके, भाऊ योगेश फाळके, पत्नी अर्चना व मुलगा संस्कार यांचे सांत्वन केले. शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

राहुल फाळके यांचा मुलगा संस्कार (4 वर्ष) याच्या शिक्षणासाठी शिवसेनेच्यावतीने 10 लाख रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवण्यात येणार आहेत. पत्नी अर्चना फाळके हिचे नावाने 10 लाख रुपये ठेवी ठेवण्यात येणार आहेत. एकूण 20 लाख रुपयांच्या या ठेवीमधून येणाऱ्या व्याजातून मुलाचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली आहे.

 

राहुल फाळके यांनी मृत्यूपूर्वी फेसबुकवर व्यक्त केलेले मनोगताची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतल्या असून राहुल फाळके यांनी मृत्यूपूर्वी शिवसेनेकडे त्याची अडचण सांगितली असती तर शिवसेनेने यातून मार्ग काढला असता असेही खासदार गजानन कीर्तिकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले. दरम्यान, राहुल शिवसैनिक होता. यामुळे शिवसेना कधीही त्याच्या कुटुंबियाला वाऱ्यावर सोडणार नाही, जी मदत करणे शक्य आहे. ती सर्व मदत कुटुंबियाला केली जाईल. अशी ग्वाही गजानन कीर्तीकर यांनी देऊन राहुलच्या पुढील विधीसाठी काही रोख रक्कम मदत म्हणून त्यांच्या कुटुंबीयांना दिली.

 

राहुलच्या कुटुंबासोबत शिवसेना सदैव पाठीशी राहणार आहे. जी मदत लागेल, ती कर्तव्य भावनेने शिवसेनेने स्वीकारलेली आहे, असे सांगून खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले, राहुल फाळके हा शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक होता. राहुल याने मृत्यूपूर्वी व्यक्त केलेले मनोगतात, शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आत्मीयता, प्रेम व्यक्त केले आहे. त्यांची नितांत श्रद्धा होती. शिवसैनिकांना संदेश दिला आहे. शिवसेनेला विजयी करा. व्यावसायिकांना कोणत्या गोष्टी मारक आहेत, जीवघेण्या आहेत यांचे राहुलने मनोगत व्यक्त केले आहे. त्याच्या या भावना महाराष्ट्रात व दिल्ली दरबारी मांडणार असल्याचेही खासदार गजानन कीर्तिकर यांनी यावेळी सांगितले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...