आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विट करुन शोभा डेंनी खिल्ली उडविलेल्या पोलिसाने मानले डे यांचे आभार, म्हणाला...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- स्तंभलेखिका शोभा डे यांनी ट्विट करुन अपमान केलेल्या पोलिस अधिकारी दौलतराम जोगावत यांनी डे यांचे आभार मानले आहेत. मध्य प्रदेशातील लठ्ठ पोलिस अधिकारी दौलतराम जोगावत यांनी गेल्या वर्षी डे यांनी ट्विट केल्यानंतर जोगावत यांनी वजन कमी करण्याचे मनावर घेतले. एवढेच नाही तर त्यांनी मुंबई गाठून वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली. ज्यामुळे जोगावत यांचे वजन आता 180 किलोवरुन थेट 115 किलोवर आले आहे. त्यांनी एकूण 65 किलो वजन घटवले आहे.

 


डाएट आणि व्यायाम करुन अजून 30 किलो वजन कमी करण्याचे लक्ष्य दौलतराम जोगावत यांनी ठेवले आहे. मुफज्जल लकडावाला यांनी जोगावत यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया केली. मुंबईतील सैफी रुग्णालयात जोगावत यांच्यावर गॅस्ट्रिक बायपास प्रोसिजर झाली. या सगळ्या प्रकारानंतर जोगावत यांनी शोभा डे यांचे आभार मानले. त्यांनी ट्विट केल्यामुळेच वजन कमी करण्याचा आपण गांभीर्यानं विचार केला, असे जोगावत म्हणाले.

 


आणखी 30 किलो वजन कमी केल्यावर मी शोभा डे यांना नक्की भेटेन असेही ते म्हणाले. सध्या जोगावत मध्य प्रदेशातील नीमच शहरातील कंट्रोल रुममध्ये तैनात आहेत. ते पुढच्या वर्षी सेवानिवृत्त होतील. पुढील दीड वर्ष जोगावत यांना लिक्वीड डाएट देण्यात येणार आहे. त्यानुसार दौलतराम यांचे वजन शंभर किलोने कमी करण्याचा प्रयत्न असेल. सोबतच त्यांचा रक्तदाब आणि मधुमेहही नियंत्रणात येणार आहे.

 


जोगावत यांच्यावर मोफत उपचार होणार आहेत. मध्य प्रदेश सरकारची इच्छा असल्यास, ते हा खर्च उचलू शकतात, मात्र दौलतराम यांच्याकडून एकही पैसा घेतला जाणार नसल्याचे सैफी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 


पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...