आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंगायत व वीरशैवला स्वतंत्र धर्माचा दर्जा द्या; कर्नाटक सरकारची शिफारस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू- कर्नाटक सरकारने लिंगायत व वीरशैव-लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देण्याची शिफारस केंद्राकडे करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा आणि संसदीय कार्य मंत्री टी.बी. जयचंद्र यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर यासंबंधीची माहिती दिली. कॅबिनेटमध्ये कर्नाटक अल्पसंख्याक आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या. यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तसेच इतर अल्पसंख्यांक व बहुसंख्याक लोकांवर या निर्णयाचा काय परिणाम होईल, याचा विचार करून अधिसूचना काढण्यात येईल. न्या. नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या विशेष समितीचा अहवाल आयोगाने पुढे पाठवला होता. या निर्णयानंतर इतर धर्माच्या अल्पसंख्यांकांना मिळणाऱ्या लाभावर काही फरक पडू नये, अशी शिफारसही आयोगाने केली. अभ्यासासाठी गेल्या वर्षी सात सदस्यीय समिती स्थापन केली होती.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती व फोटोज....