आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कणकवली नगरपंचायत निकाल: नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाचा मोठा विजय, युतीचा फज्जा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने बाजी मारली आहे. 17 जागांपैकी राणेंच्या स्वाभिमान पक्षाने 10 जागा जिंकल्या आहेत तर ज्यांच्याशी आघाडी केली त्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. तर, शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी तीन-तीन जागांवर यश मिळवता आले. 

 

नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादीसोबत युती करून भाजप-शिवसेना यांच्या युतीचा दारूण पराभव केला आहे. नगराध्यक्षपदासाठी राणेंच्या पक्षाकडून समीर नलावडे तर युतीकडून संदेश पारकर यांच्यात थेट लढत होती.  मात्र, नलावडे यांनी पारकर यांचा केवळ 37 मतांनी पराभव करत नगराध्यक्षपद पदरात पाडून घेतले.

 

राणेंच्या गटाकडून आमदार नितेश राणे यांनी या निवडणुकीत संपूर्ण लक्ष घातले तर भाजप-शिवसेना युतीच्या वतीने भजापचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आणि शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी लक्ष घातले. हे सर्व नेते निवडणुकीच्या काळात कणकवलीत ठाण मांडून बसले होते. राणेंच्या पराभवासाठी दिपक केसरकर यांनीही पाण्यात देव मांडून ठेवले होते. मात्र, राणेंनी या सर्वांना धोबीपछाड दिला आहे.

 

नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे राणेंच्या घरच्या मैदानावर पक्षाला कसे यश मिळते याकडे सर्वांचे लक्ष होते. राणेंनी भाजपची खासदारकी स्वीकारली असली तरी स्थानिक राजकारणात राणेंच्या पक्षाने राष्ट्रवादीशी आघाडी केली आहे तर भाजपविरोधात रोज शड्डू ठोकणा-या शिवसेनेने ते भाजपसोबत युती केली होती. कणकवली शहरात संदेश पारकर यांचे वर्चस्व आहे तर नितेश राणे हे तेथील आमदार आहेत. त्यामुळे या लढतीकडे राणे विरूद्ध संदेश पारकर असे पाहिले जात होते. यात राणेंनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित फोटोज....

बातम्या आणखी आहेत...