आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यभराता मोठ्या उत्साहात मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले. घरोघरी गुढी उभारून नव्या वर्षाचे स्वागत करण्याबरोबरच अनेक शहरांमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास शोभायात्रा काढल्या जातात. या शोभायात्रामध्ये मराठी परंपरांची खास झलक पाहायला मिळत असते.
मुंबईतील अशाच काही शोभायात्रांना अनेक वर्षांचा इतिहास आहे. यापैकीच एक म्हणजे मुंबईच्या गिरगावातील शोभायात्रा. या शोभायात्रेमध्ये तरुणाई मोठ्या उत्साहाने हजेरी लावत असते. यावर्षीही मोठ्या प्रमाणात तरुणाई याठिकाणी उपस्थित होती. विशेष म्हणजे तरुणींची दुचाकीवरून निघणारी रॅली या शोभायात्रेचे आकर्षण ठरली. संपूर्ण पारंपरिक वेशातील तरुणी बाईकवरून निघाल्यानंतर परंपरा आणि आधुनिकता यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळाला. फोटोग्राफर हेमेन खत्री यांनी या शोभायात्रेतील क्षण टिपले आहेत.
हेमेन खत्री हे छंद म्हणून फोटोग्राफी करतात. ते प्रत्यक्षात आय टी क्षेत्रात काम करतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी हा छंग जोपासला आहे. चला तर हेमेन खत्री यांच्या नजरेतून अनुभवुयात गिरगावातील शोभायात्रेची सफर.
पुढील स्लाइड्सवर पाहा शोभायात्रेचे काही खास PHOTOS
फोटो सौजन्य - हेमेन खत्री (HK Shots)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.