आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Mumbai: सट्टा बाजारातील प्रसिद्ध बुकी सोनू जलानला अटक, प्रदीप शर्माची कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील सट्टेबाजारात प्रसिद्ध असलेला सोनू जलान ऊर्फ सोनू मालाड याला मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने ही कारवाई केली. त्याला अटक केल्याने त्याच्याकडील चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे व माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

सोनू जलान हा मुंबईतील सट्टा बाजारातील मोठा व प्रसिद्ध बुकी म्हणून ओळखला जातो. सोनूचे पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका, सौदी अरेबियासह अफगाणिस्तानात त्याचे ग्राहक आहेत. सोबतच भारतात मुंबई, अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, हरयाणा व राजस्थानात त्याचे साथीदार आहेत.

 

कांदिवलीतील वास्तव्यास असलेल्या जलानला मुंबई पोलिसांनी क्रिकेट सट्टेबाजीच्या संबंधात त्याला अनेक वेळा अटक झाली आहे. 2012 मध्ये एक आंतरराष्ट्रीय सामना फिक्स करण्यासाठी श्रीलंकेच्या एका क्रिकेटपटूला दहा कोटी रूपये दिल्याची कबुली त्याने मुंबई क्राईम बॅंचला दिली होती. तसेच आपली अटक टाळण्यासाठी त्याने एका IPS अधिका-याला 1 कोटी रूपयाची लाच दिली होती. तसेच एका IPS अधिका-याला तो मुली पुरविण्याचेही काम करत असल्याची माहिती समोर आली होती. पत्नी शागुफ्ता खान हिच्या हत्येप्रकरणी सोनूला संशयित म्हणून पाहिले जाते.

बातम्या आणखी आहेत...