आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लेडी सुपरकॉप\' नावाने फेमस होती ही IPS, अंडरवर्ल्डही दबकून होते या \'मर्दानी\'ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरा बोरवणकर - फाइल फोटो - Divya Marathi
मीरा बोरवणकर - फाइल फोटो

मुंबई- देशात असे अनेक IAS, IPS अधिकारी आहेत ज्यांच्यामुळे जनतेत कायदा आणि सुव्यवस्था याबाबत विश्वास कायम आहे. यानिमित्ताने आम्ही अशा काही 'धाडसी' अधिका-यांबाबत माहिती घेऊन आलो आहोत. आज आम्ही रिटायर्ड IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्याबाबत माहिती घेऊन आलो आहोत. सुपरकॉम नावाने होत्या प्रसिद्ध...

 

- मीरा या मूळच्या पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील आहेत. त्यांचे वडील ओ. पी. चड्ढा बॉर्डर सिक्यूरिटी फोर्स (BSF) मध्‍ये होते. 
- मीरा यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण फाजिल्कामध्‍ये झाले.  1971 में त्‍यांच्‍या वडिलांची जालंधर येथे बदल झाली. त्‍यामुळे जालंधर येथे मीरा यांनी पुढील शिक्षण घेतले.
- 1981 मध्ये त्या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी झाल्या. त्यांचे पती अभय बोरवणकर रिटायर्ड IAS आहेत. सध्या ते बिजनेस करतात.
- लेडी सुपरकॉम नावाने प्रसिद्ध राहिलेल्या मीरा ऑक्टोबर 2017 मध्ये रिटायर्ड झाल्या आहेत. सध्या त्या मुंबईत राहतात.
- IPS बनल्यानंतर त्यांची पोस्टिंग महाराष्ट्रातील अनेक मोठ्या शहरात झाली ज्यात मुंबईतील त्यांचा रोल महत्त्वाचा राहिला.
- मुंबईतील अंडरवर्ल्डमधील गुंडाराज संपविण्यासाठी मीरा यांचे योगदान मोठे होते.
- मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुख झाल्या तेव्हा हे पद मिळवणाऱ्या त्या पहिला महिला होत्या. 
- तेथे अंडरवर्ल्डवरील कारवाईमुळे त्यांची कठोर अधिकारी ही प्रतिमा दृढ झाली. त्यांनी दाऊद इब्राहिम आणि छोटा राजनच्या अनेक गुंडांना तुरुंगात पाठवले. 

 

दाऊदची बहिण चळाचळा कापायची-

 

- दाऊदची बहीण हसीना भावाच्या नावावर वसुली करत आहे, अशा बातम्या मुंबई गुन्हे शाखेकडे अनेकदा येत असत. 
- एक दिवस एक तक्रार आली, पण एफआयआर लिहीत असताना तक्रार करणारी महिला गायब झाली. मीरांनी तिचा खूप तपास केला.
- त्यामुळे दाऊदच्या बहिणीला मीरा यांची भीती वाटायला लागली. नंतर एक रेकॉर्डिंग मीरांपर्यंत पोहोचले. 
- त्यात हसीना ही एक विशेष नमाज अदा करा, या मीरा बोरवणकर यांची बदली करा,' असे म्हणत असल्याचे ऐकू येते.

 

संजय दत्तला तुरूंगातीलच जेवण-

 

- पोलिस विभागात त्यांची कठोर अशी ख्याती होती. तुरुंग महानिरीक्षक असताना त्यांनी संजय दत्तला थोडाही दिलासा दिला नाही. 
- संजय दत्तला बाहेरून डबा येत असल्याची माहिती मिळाली. मग एक दिवस संजय काय करत आहे हे पाहण्यासाठी त्या अचानक येरवडा तुरुंगात गेल्या. 
- पहिल्यांदा तर आपण कुठे जात आहोत हे त्यांनी आपल्या चालकालाही सांगितले नव्हते. अचानक त्यांनी येरवडा तुरुंगाकडे मोर्चा वळवला. 
- जिथे संजय दत्त होता तिथे थेट गेल्या. तिथे अनेक पुस्तकं, पटकथा आहेत असे त्यांना दिसले. संजयला त्यांच्याबद्दल माहिती होतील. 
- तो मीरा यांना म्हणाला, 'तुम्ही पंजाबी आहात. फजिल्काच्या आहात.' पण कडक शिस्तीच्या मीरा यांनी संजय दत्तला तुरुंगातीलच जेवण घ्यायचे असा दम भरला होता. 
- मीरा जेव्हा तुरुंग महानिरीक्षक होत्या तेव्हा अजमल कसाब आणि याकूब मेमनला त्यांच्या निगराणीतच फाशी देण्यात आली. 

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, मीरा बोरवणकर यांच्याविषयी माहिती.....

बातम्या आणखी आहेत...