आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- रेल्वे परीक्षा भरतीमधील गोंधळामुळे संतप्त झालेल्या रेल्वे अप्रेंटिस प्रशिणार्थी आंदोलक मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला गेले. दुपारी 1 च्या सुमारास राज ठाकरे यांनी प्रशिक्षणार्थींचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर मनसे तुमच्या पाठीशी राहील असे आश्नासन दिले. सोबतच तुमच्या शिष्टमंडळासह मनसेचे दोन नेते दिल्लीत पाठवले जातील असेही राज यांनी सांगितले.
आज सकाळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर रेल्वे स्टेशनदरम्यान सकाळी सात वाजल्यापासून ठाण मांडले. अखेर सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर साडेतीन तासांनी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, तिकडे दिल्लीत संसदेत हा विषय गाजला. शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने दिल्लीत तत्काळ रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली.
दगडफेकीमुळे लाठीचार्ज- फडणवीस
दरम्यान, रेल्वे अप्रिंटिस विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून विधानसभेत पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, धनंजय मुंडे यांच्यासह इतर विरोधी नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच विद्यार्थ्यांवर लाठीमार व मारहाण केल्याप्रकरणी सरकारला जाब विचारला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सकाळी तणावपूर्ण स्थिती होती. त्यातच विद्यार्थ्यांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. यामुळे पोलिसांनी नाईलाजाने लाठीमार करावा लागला. मात्र, यात कोणीही गंभीर जखमी नाही. रेल्वेत अप्रिंटिस करणा-या सर्व विद्यार्थ्यांना सामील करून घ्या अशी त्यांची मागणी आहे. मात्र तसे झाल्यास उर्वरित लोकांना नोक-या देता येणार नाहीत त्यामुळे त्यांच्यासाठी 20 टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. मात्र, यावर तोडगा काढला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.