आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडे यांना धमकी देणारा अधिकारी निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन धमकी देणारा भिवंडी येथील अन्न सुरक्षा अधिकारी अार.डी. अाकरूपेला निलंबित करण्यात येत असल्याची घाेषणा अन्न आणि अाैषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.   प्रश्नाेत्तराचा तास संपल्यानंतर विराेधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास ही बाब अाणून दिली. ते म्हणाले, अन्न आणि अाैषध प्रशासन विभागातील अधिकारी भाजपच्या अामदारांना घेऊन अापल्या कार्यालयात अाले हाेते. गेल्या अाठवड्यात राज्यातील गुटखाबंदीसंदर्भात अापण लक्षवेधी सूचना मांडली हाेती. या सूचनेवर अन्न आणि औषधी प्रशासन मंत्र्यांनी उत्तर दिले हाेते. ती लक्षवेधी विचारल्यामुळेच अधिकारी अाकरूपेने  कार्यालयातील  विशेष कार्याधिकाऱ्यांना धमकावले. दरम्यान, बापट यांनी आकारुपेला निलंबित केल्याचे सभागृहात सांगितले.
बातम्या आणखी आहेत...