Home | Business | Auto | tata nexon aero features and prices revealed

टाटा Nexon Aero अॅडिशनचे हे आहेत फीचर्स, जाणून घ्या काय आहे खास

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2018, 06:54 PM IST

टाटा मोटर्सने आपल्या पॉप्यूलर कॉम्पॅक्ट नेक्सॉनचे स्पेशल अॅडिशन Nexon Aero लॉन्च केले. ते ऑटो एक्स्पो 2018 म

 • tata nexon aero features and prices revealed

  मुंबई- टाटा मोटर्सने आपल्या पॉप्यूलर कॉम्पॅक्ट नेक्सॉनचे स्पेशल अॅडिशन Nexon Aero लॉन्च केले. ते ऑटो एक्स्पो 2018 मध्ये सादर करण्यात आले. हे स्पेशल अॅडिशन वेगवेगळ्या बॉडी किट्स, डिझाईन, स्टाईल, वेगवेगळ्या इंटेरियर ट्रिम ऑप्शनमध्ये सादर करण्यात आले. कंपनीने अजून Nexon Aero ला ऑफिशली लॉन्च केलेले नाही. एरो किटची इमेज ब्रोशरमधून लीक झाल्याने याची किंमत आणि फीचर्सची माहिती समजली आहे.

  टाटाच्या वतीने एअरो किटची तिसऱ्या लेवलची ऑफर देण्यात येत आहे. बेस लेव्हल 1 किटची सुरुवातीची किंमत 30, 610 रुपये एवढी आहे. ती लेव्हल 3 च्या किटसाठी 61,574 रुपयांपर्यंत जाऊ शकते. याशिवाय तुम्हाला टॅक्स, लेबर चार्ज द्यावा लागणार आहे. त्याची किंमत साधारणपणे सहा ते सात हजार असु शकते.

  टाटा नेक्सॉन एअरो किट लेव्हल 1
  टाटा नेक्सॉन एअरो लेव्हल 1 च्या किटमध्ये बंपर प्रोटेक्टर्स आणि साईड स्कटर्स सारख्या वस्तू देण्यात येणार आहेत. हे किट लावल्यासाठी कारमध्ये कोणतेही बदल करावे लागणार नाहीत. हे किट कारच्या सर्व श्रेणी XE, XM, XT, XZ आणि XZ+ साठी उपलब्ध होणार आहे. किटची किंमत कारच्या एक्स-शोरुम किमतीसोबत जोडण्यात येणार आहे.


  लेव्हल 1 किटची किंमत : 30,610 रुपये

  पुढील स्लाईडवर वाचा आणखी माहिती

 • tata nexon aero features and prices revealed

  टाटा नेक्सॉन एअरो किट लेव्हल 2
  एअरो किट लेव्हल 2 मध्ये दोन ऑप्शन्स आहेत. पहिल्या ऑप्शनमध्ये किटला नेक्सॉनच्या केवळ तीन टॉप वेरिएंट्समध्ये लावता येणार आहे. यात एअरो सीट कव्हर, एअरो कार्पेट्स, स्कफ प्लेट्स आणि लाल मिरर कव्हर असतील. त्याचवेळी दुसऱ्या ऑप्शनचे किट XZ आणि XZ+ श्रेणीत लावता येणार आहे. यात पहिल्या ऑप्शनमधील एलिमेंटशिवाय अलॉय व्हील्ससाठी रिमबैंड्सही देण्यात येणार आहेत.

  लेव्हल 2 किटची किंमत: 40,824 रुपये आणि 46,856 रुपये

  पुढे वाचा...

 • tata nexon aero features and prices revealed

  टाटा नेक्‍सॉन एअरो कि‍ट लेवल 3

  एअरो किट लेव्हल 3 मध्ये तुम्हाला दोन पध्दतीचे ऑप्शन्स मिळतील. यात लेव्हल 1 आणि 2 चे फीचर्स तर असतीलच. याशिवाय ग्लॉसी ब्लॅक रुफ रॅम्प आणि लाल रंगाचे अलॉय व्हिल्सही देण्यात येतील. याच्या पहिल्या ऑप्शनसाठी आपल्याला 55,625 रुपये खर्च करावे लागतील. तर दुसऱ्या ऑप्शनसाठी 61,574 रुपये द्यावे लागतील. 

Trending