आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत काँग्रेसचे 84 वे महाअधिवेशन, देशभरातून 12 हजार कार्यकर्ते हजर, पाहा फोटोज...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- काँग्रेस पक्षाचे 84 वे महा अधिवेशन नवी दिल्लीत सुरू आहे. दोन दिवसीय या महाअधिवेशनाचा आज सायंकाळी समारोप होत आहे. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी समारोपाचे भाषण करतील. त्याआधी शनिवारी सकाळी या महाविधेशनाचे उद्घाटन झाले. 

 

या अधिवेशनासाठी पक्षाचे देशभरातून 12 हजारांहून अधिक कार्यकर्ते दिल्लीत जमा झाले आहेत. 

शनिवारी राहुल गांधी उद्घाटनप्रसंगी केवळ 4 मिनिटांचे भाषण केले व सविस्तर, विस्ताराने समारोप भाषणात बोलेन असे सांगितले. मात्र, शनिवारी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

 

रविवारी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मागील चार वर्षाच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे कसे तीन-तेरा वाजले आहेत याची माहिती देत मोदी सरकारचे वाभाडे काढले आहेत. आता समारोप भाषणात राहुल गांधी काय बोलतात, पक्षाचे भविष्यातील धोरण काय, मित्रपक्ष व प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याबाबत व मोदी सरकारवर कशा पद्धतीने हल्लाबोल करतात याची उत्सुकता आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, काँग्रेसच्या 84 व्या महा अधिवेशनाचे रंगारंग दाखविणारे फोटोज......

बातम्या आणखी आहेत...