आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याचा दावा: संपूर्ण हागणदारीमुक्ती, केंद्र म्हणते: उघड्यावर शाैच सुरूच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवण्यात आले. सर्व प्रशासकीय यंत्रणांनी अभियान राबवून राज्यात शौचालय बांधण्याचे काम हाती घेत मुदतपर्वूी ६० लाख शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले. त्यामुळे राज्यातील ३४ जिल्हे, ३५१ तालुके, २७ हजार ६६७ ग्रामपंचायती आणि ४०  हजार ५०० गावांत प्रत्येकास शौचालय उपलब्ध झाले असून महाराष्ट्र आज हागणदारीमुक्त झाले आहे, अशी घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

 

मुख्यमंत्री  म्हणाले, राज्यात २०१२ पर्यंत ४५ टक्के कुटुंबाकडे शौचालय होती. देश प्रगती करीत असताना ५५ टक्के कुटुंबाकडे शौचालय नसणे गंभीर बाब असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान घोषित केले. त्याअंतर्गत आॅक्टोंबर २०१९ पर्यंत राज्य हागणदारीमुक्त करायचे होते. मात्र महाराष्ट्राने दीड वर्ष आधीच हागणदारीमुक्त राज्याचे उद्दिष्ट पार पाडले आहे. पहिला टप्पा हा शौचालय उपलब्धतेचा होता. आता दुसऱ्या टप्प्यात शौचालयांचा वापर करण्यास बाध्य केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जाहीर केले. मात्र, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत या संकेतस्थळावरील अद्ययावत माहितीनुसार महाराष्ट्रातील १२ गावे, शहरांत अद्याप उघड्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण जास्त असल्याचे व ही गावे, शहरे हागणदारीमुक्त नसल्याचे म्हटले आहे. केंद्राने स्वच्छ भारत अभियान हाती घेतल्यानंतर त्याची अद्ययावत व इत्थंभूत माहिती मिळावी यासाठी स्वच्छ भारत मिशनसाठी स्वतंत्र संकेतस्थळ काढले. यावर देशातील, राज्यांतील या अभियानाची संपूर्ण माहिती वेळोवेळी अपडेट केली जाते. या संकेतस्थळानुसार महाराष्ट्रातील १२ गावे, शहरे हागणदारीमुक्त नसल्याचे स्पष्ट होते.   

 

अनेक शहरांत अद्याप उघड्यावर
राज्यातील पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नवी मुंबई, मुंबई या प्रमुख शहरांत आजही उघड्या मैदानात शौचास जाण्याचे प्रमाण जास्त आहे. औरंगाबादेत ६ ते ७ वॉर्डांत खुल्यावर शौचाला जाण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. असेच चित्र नागपूर, नाशिक या महापालिका क्षेत्रात आहे.

 

१२ गावे, शहरे हागणदारीयुक्त
स्वच्छ भारत अभियानानुसार, एखादे गाव हागणदारीमुक्त होते तेव्हा तसा अहवाल देऊन त्याचे प्रमाणपत्र मिळवावे लागते. जानेवारी २०१८ ते १३ एप्रिल २०१८ पर्यंतच्या माहितीनुसार राज्यातील १२ गावांकडे हे प्रमाणपत्र नाही.


ती गावे अशी : नगर,वर्धा,अरमोरी,अार्णी,धरणगाव,लाखणी,बिलोली,जामखेड,म्हसाळा,श्रीवर्धन,कळमनुरी,मलकापूर (जि. कोल्हापूर)

 

पुढील स्लाईडवर पाहा,महाराष्ट्र सरकारचे दावे  आणि शहरातील शौचालयांची स्थिती.... 

बातम्या आणखी आहेत...