आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी स्थानकांवरील शाैचालयांची कामे अाता ‘सीएसअार’ निधीतून’- दिवाकर रावते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील सर्व एसटी स्थानकांवर असलेल्या शौचालयांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. हे लक्षात घेता यापुढे बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर शौचालयांची कामे काेणालाही दिली जाणार नाहीत, तर सामाजिक बांधिलकी निधीतून (सीएसआर फंड) ही सर्व कामे करण्यात येतील, असे अाश्वासन देऊन त्यासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.


मराठवाडा विभागात राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकांची दुरवस्था झाली असून शौचालयांची परिस्थिती तर खूपच वाईट असल्याकडे  राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले. त्यासाठी प्रवाशांना तातडीने मूलभूत सुविधा  तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर उत्तर देताना परिवहन मंत्री रावते म्हणाले, एसटी आगारातील शौचालयांची अवस्था फारशी चांगली  नाही, हे मान्य करत हे काम सीएसआर फंडातून उपलब्ध झालेल्या निधीतून लवकरच सुरू करण्यात येईल, असे अाश्वासन त्यांनी दिले. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील सर्व एसटी स्थानकावर सीसीटीव्ही लावण्याचे काम सुरू झाले असून पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित स्थानकांसाठी निविदा मागवण्यात आल्याचे स्पष्ट केले. विमानतळाच्या धर्तीवर राज्यातल्या १५ बस आगारांमध्ये बसतळ सुरू करण्यात येणार आहे. पनवेल येथे या पहिल्या बसतळाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आल्याचे ते म्हणाले.   
बसस्थानकांवर सुरक्षा वाढवणार : रावते
सर्व एसटी बसस्थानकांचे नूतनीकरण करून त्यामध्ये अामूलाग्र बदल करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी तरतूदही उपलब्ध करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी सैन्यातील सेवानिवृत्तांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमण्यात येईल. शिवनेरी, शिवशाहीच्या प्रवाशांना आगारांमध्ये वातानुकूलित सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...