आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • मोठी बातमी: पेट्रोलच्या दरांमध्ये महिनाभरात 3 रुपयांनी पडला फरक Todays Latest Petrol And Diesel Price Know Your Cities Price News And Updates

Petrol-Diesel Price: सलग दुसऱ्या दिवशी दर स्थिर, महिनाभरात पेट्रोल 3, तर डिझेल 2 हून अधिक रुपयांनी स्वस्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर आहेत. मंगळवारपासून कोणतीही कपात झालेली नाही. मंगळवारी मुंबईत पेट्रोलचे दर लिटरमागे 0.18 पैशांनी कमी झाले होते, तर डिझेलचे दरही लिटरमागे 0.14 पैशांनी घसरले होते. गेल्या 28 दिवसांपासून पेट्रोलच्या दरामध्ये फक्त 3 रुपयांची कपात झाली आहे. तर डिझेलही 2 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गुरुवारी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 83.12 रुपये, तर डिझेलचे दर 71.52 रुपये प्रति लिटर इतके आहेत.

 

इतर महानगरांचा विचार करता दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईत पेट्रोलचे दर अनुक्रमे 75.55, 78.23 आणि 78.40 प्रति लिटर एवढे आहेत. ओपेक म्हणजे पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेने गेल्या आठवड्यामध्ये क्रूड ऑइलच्या उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये क्रूड ऑइलच्या बॅरलचे दर घसरले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांत इंधन दर घसरल्याचे दिसले. तसेच नुकतेच पेट्रोलियम मंत्र्यांनीही पुढील काळात पेट्रोलच्या किमती कमी होणार असल्याचे विधान केले होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...