आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत Petrol दरात 6, तर Diesel मध्ये 3 पैशांनी कपात, जाणून घ्या इतर शहरांतील आजचे दर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मंगळवारपासून बदल न झालेले पेट्रोल व डिझेलचे दर आज मात्र बदललेले आहेत. शुक्रवारी मुंबईत पेट्रोलचे दर लिटरमागे 0.6 पैशांनी, तर डिझेलचे दरही लिटरमागे 0.3 पैशांनी घसरले आहेत. गेल्या महिनाभरात पेट्रोलच्या दरामध्ये फक्त 3 रुपयांची कपात झाली, तर डिझेलही 2 हून अधिक रुपयांनी स्वस्त झाले आहे. शुक्रवारी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 83.06 रुपये, तर डिझेलचे दर 71.49 रुपये प्रति लिटर इतके आहेत.

 

इतर महानगरांचा विचार करता दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईत पेट्रोलचे दर अनुक्रमे 75.55, 78.23 आणि 78.40 प्रति लिटर एवढे आहेत. ओपेक म्हणजे पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेने गेल्या आठवड्यामध्ये क्रूड ऑइलच्या उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये क्रूड ऑइलच्या बॅरलचे दर घसरल्याचे आपण पाहिजे, तरीही देशातील पेट्रोलचे दर काही कमी झाले नाहीत. नुकतेच अमेरिकेने भारतासह इतर काही इराणकडून केली जाणारी कच्च्या तेलाची आयात बंद करण्याचा इशारा दिलेला आहे. यामुळे क्रूड ऑइलच्या दरांमध्ये वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

 

स्रोत:इंडियन ऑइल  

 

 

बातम्या आणखी आहेत...