आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Petrol- Diesel Price: मुंबईत आज 6 पैशांनी स्वस्त पेट्रोल, डिझेलमध्ये दिलासा नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महिनाभरापासून तिळातिळाने कमी होत जाणाऱ्या पेट्रोलचे दर आज मात्र बदललेले आहेत. शुक्रवारी मुंबईत पेट्रोलचे दर लिटरमागे 0.6 पैशांनी घसरले आहेत. तर डिझेलचे दर गेल्या 3 दिवसांप्रमाणे स्थिर आहेत. गेल्या महिनाभरात पेट्रोलच्या दरामध्ये जवळपास 3 रुपयांची कपात झाली असून डिझेलही 2 हून अधिक रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोमवारी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 82.94 रुपये, तर डिझेलचे दर 71.49 रुपये प्रति लिटर इतके आहेत.

 

इतर महानगरांचा विचार करता दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईत पेट्रोलचे दर अनुक्रमे 75.55, 78.23 आणि 78.40 प्रति लिटर एवढे आहेत. ओपेक म्हणजे पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांच्या संघटनेने गेल्या आठवड्यामध्ये क्रूड ऑइलच्या उत्पादनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये क्रूड ऑइलच्या बॅरलचे दर घसरल्याचे आपण पाहिजे, तरीही देशातील पेट्रोलचे दर काही कमी झाले नाहीत. नुकतेच अमेरिकेने भारतासह इतर काही इराणकडून केली जाणारी कच्च्या तेलाची आयात बंद करण्याचा इशारा दिलेला आहे. यामुळे क्रूड ऑइलच्या दरांमध्ये वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

 

स्रोत:इंडियन ऑइल   

 

बातम्या आणखी आहेत...