आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Todays Petrol Price: सलग 5व्या दिवशी पेट्रोल-डिझेल महाग, जाणून घ्या आजचे दर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमधील वाढ थांबण्याची चिन्हे नाहीत. सोमवारी सलग 5व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोल 83.28 रुपयांपर्यंत गेले असून, डिझेल पुन्हा जवळपास 72 रुपयांपर्यंत गेले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सातत्याने होत असलेल्याचा वाढीचा भारतीय रुपयाला फटका बसत असताना याच कारणांमुळे इंधन दरवाढीचाही भडका उडाला आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत आहे.

महिनाभरानंतर पुन्हा महागाईचा भडका
या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 83.28, तर डिझेलचे दर 71.83 रुपयांवर पोहोचले. याचप्रमाणे नवी दिल्लीत पेट्रोलचे दर 76.40, चेन्नईत 79.29, कोलकात्यामध्ये 79.07 रुपये असे झाले आहेत. तर डिझेलचे दर नवी दिल्ली- 67.07 रुपये, चेन्नई - 71.45 रुपये, कोलकाता- 70.24 रुपये असे झाले आहेत.

 

पुरवठा वाढूनही कमी झाले नाही दर...
इंधन तेल निर्यात करणाऱ्या देशांनी रोजच्या पुरवठ्यात १० लाख बॅरलची वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने भारतातील सरकारी तेल कंपन्यांनी सावध पवित्रा घेतला होता. तेलाचा पुरवठा वाढला, तर दर कमी होतील या शक्यतेने भारतीय सरकारी तेल कंपन्यांनी मागचे 8 दिवस कोणतेही बदल केले नव्हते. इंधनाच्या किंमतीत आठ दिवस बदल केले नव्हते. इंधन तेल निर्यात करणाऱ्या देशातील रोजच्या पुरवठ्यात थोडीशी वाढ केली, परंतु अमेरिकेने इराणविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे या वाढलेल्या तेल पुरवठ्याचा काहीही फायदा होऊ शकला नाही.

 

बातम्या आणखी आहेत...