आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरव मोदीवरून शिवसेना-भाजपमध्ये टिवटिवाट, राऊत यांच्या टीकेला शेलार म्हणाले \'टुकार काव्य\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पंजाब नॅशनल बँकेला 11400 कोटींचा चुना लावून नीरव मोदी फरार झाला आहे. पण त्यावरून आता चांगलेच राजकारण पेटले आहे. एकिकडे विरोधक या मुद्द्यावरून भाजपला घेरत आहेत. तर दुसरीकडे सत्तेत राहून विरोधकांची भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेही यावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. शुक्रवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीटरवर 'मोदी' नावाचा वापर करून टीका केली होती. त्यावर शनिवारी आशिष शेलार यांनी रावतांवर हल्लाबोल केला. ट्वीटरवर छेडलेल्या या युद्धामध्ये शेलार यांनी राऊत यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. 


काय म्हणाले होते राऊत...
नीरव मोदी परदेशात फरार झाल्याच्या बातम्या आणि घोटाळा उघड झाल्यानंतर संजय राऊत यांची ट्वीटरवर या प्रकरणी चिमटा काढला होता..पैसे बॅंक मे रखो तो, नीरव मोदी का डर.. घर मे रखो तो नरेंद्र मोदी का.. असे ट्वीट करत त्यांनी मोदी नावावरून भाजपवर हल्लाबोल केला होता. नोटबंदीच्या मुद्द्याला धरून राऊत यांनी ही टीका केली होती. 


शेलार यांनी असे दिले उत्तर..
आशिष शेलार यांनीही ट्वीटरवर लगेचच याला उत्तर दिले. ट्वीटरवर त्यांनी पोस्ट केले की, "मोदी"या शब्दाचे यमक जुळवून टुकार काव्य प्रभादेवीच्या गल्लीत बसून काहींना सूचले... तेव्हाच कळले आता "शिमगा" जवळ आलाय! तसा वर्षभरच यांचा शिमगाच असतो म्हणा!! उगाच "यमका" साठी सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय,तीच थुंकी आपल्या तोंडावर पडू नये म्हणजे झाले!!! 


पुढील स्लाइड्सवर पाहा, संजय राऊत आणि आशिष शेलार यांचे ट्वीट्स...

बातम्या आणखी आहेत...