आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..अन् बालंबाल बचावले 330 प्रवासी, IndiGoच्या दोन विमानांमध्ये राहिले होते फक्त 200 फूट अंतर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बंगळुरूच्या अवकाशात मंगळवारी इंडिगो (IndiGo)ची दोन विमाने समोरासमोर धडकण्यापासून बालंबाल बचावली. दोन्ही विमानांमध्ये तब्बल 330 प्रवासी स्वार होते. सूत्रांनुसार, या घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या घटनेतील विमान कोइंबतूर-हैदराबाद आणि बंगळुरू-कोचिन हवाई मार्गाने जात होते.

 

इंडिगोने दिला दुजोरा
इंडिगो एअरलाइन्सच्या या एका अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. हैदराबादला जाणाऱ्या विमानात एकूण 162 प्रवासी होते, तर दुसऱ्या विमानात 166 प्रवासी स्वार होते. सूत्रांनुसार, दोन्ही विमाने जेव्हा एकमेकांसमोर आली तेव्हा त्यांच्या अवघे 200 फुटांचे अंतर राहिले होते. ट्रॅफिक कोलिजन अव्हायडन्स सिस्टिम (टीसीएएस) अलार्म वाजल्यानंतर हा अपघात टळू शकला. अलार्म वाजताच वैमानिकांनी ताबडतोब विमानांची दिशा बदलली अन्यथा हवेतच धडकून मोठा अनर्थ घडला असता.

 

सूत्रांनुसार, विमान दुर्घटना तपास समिती (एएआयबी) ने 10 जुलै रोजी घडलेल्या या घटनेचा तपास सुरू केला आहे. तथापि, फेब्रुवारी महिन्यातच मुंबईत अशीच एक घटना होता-होता टळली होती. त्या वेळी एअर इंडिया आणि विस्तारा एयरलाइन्सचे विमान हवेतच धडकण्यापासून बालंबाल बचावले होते. त्या दोन्ही विमानांमध्ये तर फक्त 100 फुटांचे अंतर राहिले होते.

 

बातम्या आणखी आहेत...