आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरचा नरक झालायं, शिवसैनिकांचे सांडलेले रक्त वाया जाणार नाही- उद्धव ठाकरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नगरचा नरक झाला आहे. नगरचे हत्याकांड हा महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. खुनाचे शिंतोडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या अंगावर उडाले. अजित पवार व धनंजय मुंडे यांचे ‘हल्लाबोल’ नाट्य महाराष्ट्रात सुरू आहे. त्यांच्या दोन आमदारांनी भाजप आमदारांच्या मदतीने केडगावात ‘हल्लाबोल’ केले, दोन निरपराध माणसे मरण पावली. ते शिवसेनेचे पदाधिकारी होते. त्यांचे सांडलेले रक्त वाया जाणार नाही. नेभळट सरकार व पुचाट कायदा काय करतोय ते पाहू. नाहीतर नगरच्या पर्यटन केंद्रातील उदयास आलेल्या नव्या ‘संतां’ची पूजा वाघांचे पंजे करतील, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर घटनेवर भाष्य केले आहे. 

 

अहमदनगरचे हत्याकांड झाल्यानंतर चार दिवसानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'त अग्रलेख लिहून नगर जिल्ह्यातील हिंसाचार, राजकीय दहशतवाद आणि तेथील हत्याकांडांवर भाष्य करत टीका केली आहे.

 

उद्धव ठाकरे आपल्या अग्रलेखात लिहतात की, नगर जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून लवकरच जाहीर होईल, अशी  माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली आहे. ‘संतांची भूमी’ अशीही नगर जिल्हय़ाची ओळख आहे. साईबाबांचे शिर्डी नगर जिल्हय़ातच येते व जगभरातून लाखो भाविक, पर्यटक नगर जिल्हय़ात येत असतात. पण गेल्या चार दिवसांपासून ‘नगर’ गाजते आहे ते तेथील हिंसाचारामुळे, राजकीय दहशतवाद व त्यानंतर झालेल्या हत्याकांडांमुळे. हे प्रकरण देशभर गाजत आहे. त्यामुळे नगर वेगळ्या अर्थाने पर्यटन क्षेत्र झाले आहे व भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे ‘बाप-बेटे’ आमदार अरुण जगताप व संग्राम जगताप हे नवे ‘संतमहात्मे’ उदयास आले आहेत. वाल्याचा शुद्ध वाल्मीकी करण्याचा जोडधंदा 2014 पासून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सुरू केला. त्या उद्योगाची निर्मिती म्हणून ‘संत’ शिवाजी कर्डिले यांच्याकडे पाहावे लागेल, अशा शब्दांत राजकारणातील गुंडगिरीबाबत सडेतोड भाष्य केले आहे.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, उद्धव ठाकरे यांनी आणखी काय काय म्हटले आहे नगर हत्याकांडाबाबत....

बातम्या आणखी आहेत...