आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतक-यांनी दिलेली ‘थप्पड की गुंज’ सत्ताधा-यांच्या कायम स्मरणात राहील- उद्धव ठाकरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईवर धडकलेल्या शेतकरी वादळाचा तडाखा जबरदस्त आहे. अर्थात त्याहीपेक्षा कालबद्ध पूर्ततेच्या वचनासह लेखी आश्वासन द्यायला राज्यकर्त्यांना भाग पाडले हे त्याहीपेक्षा मोठे आणि दूरगामी यश आहे. शेतकऱ्यांनी मुंबईत येऊन दिलेली ‘थप्पड की गुंज’ सत्ताधाऱ्यांच्या कायम स्मरणात राहील आणि अन्नदाता शेतकरी आणि कष्टकरी यांच्या जीवनाची राखरांगोळी करण्याचे धाडस ते यापुढे तरी करणार नाहीत. बळीराजाने राज्यकर्त्यांना दिलेली ही शेवटची संधी आहे. मागण्यांचे पूर्ततेचे तुम्ही लेखी आश्वासन दिले आहे. ते तरी आता पाळा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारला फटकारले आहे.

 

शिवसेनेने आपल्या मुखपत्र सामनात शेतक-यांच्या आंदोलनाबाबत 'थप्पड की गूंज' या शीर्षकाखाली लिहलेल्या अग्रलेखात सरकारचे वाभाडे काढले आहेत. उद्धव ठाकरे अग्रलेखात म्हणतात, शेतकऱ्यांच्या आणखी एका तडाख्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांना वठणीवर आणले आहे. नाशिक येथून हजारो शेतकऱ्यांचे वादळ सोमवारी मुंबईवर आदळले. त्या वादळाच्या तडाख्याने सरकारचा पालापाचोळा उडून जाईल अशी भीती सत्ताधाऱ्यांमध्ये निर्माण झाली. मोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय दुसरा पर्यायही सरकारसमोर राहिला नाही. कालपर्यंत जे सरकार शेतकऱ्यांच्या मोर्चाबद्दल ढिम्म होते ते सोमवारी एकदम ‘संवेदनशील’ झाले. मोर्चेकरी शेतकऱ्यांचा आक्रोश ज्यांच्या कानावरही पडत नव्हता ते त्यांच्या मागण्यांबाबत ‘सकारात्मक’ झाले. शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनाची राखरांगोळी करण्याचा प्रयत्न आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी केला त्या प्रत्येकाला त्यांच्यासमोर झुकावेच लागले हा इतिहास आहे. शेतकऱ्यांच्या वादळामुळे सोमवारी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली.

 

भाजपवर टीकास्त्र सोडताना अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, ‘रयतेचा राजा’ छत्रपती शिवरायाचे नाव घेत सत्तेत आलेल्यांनी गेल्या तीन-साडेतीन वर्षांत फक्त घोषणाबाजीच केली आणि ‘रयते’लाच न्याय्य मागण्यांसाठी शेकडो किलोमीटर पायपीट करायला लावली. त्या बळीराजाने राज्यकर्त्यांना दिलेली ही शेवटची संधी आहे. मागण्यांचे पूर्ततेचे तुम्ही लेखी आश्वासन दिले आहे. ते तरी आता पाळा. अन्यथा शेवटची संधी ‘शेवटची काडी’ ठरेल, असे फडणवीस यांना सुनावले आहे.

 

पुढे आणखी वाचा, यासंबंधित माहिती....