आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही मोदींच्या अंताची सुरूवात, 2019 मध्ये भाजप 170 जागांवर खाली येईल- उद्धव ठाकरे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गोरखपूरच्या पोटनिवडणुकीने अहंकार व उन्मत्तपणाचा पराभव केला आहे. भारतीय जनता पक्षाला हवेतून खाली आपटणारे हे निकाल आहेत. ही तर खरी मोदींच्या सत्तेच्या अंताची सुरूवात आहे. मित्रांना दूर लोटले व खोटय़ाचा मार्ग स्वीकारला की नशिबी पराभवाचे गोटे येतात. कोसळणे सुरू होते तेव्हा कोणतेही चाणक्य पडझड रोखू शकत नाहीत. 2019 साली भाजपचा आकडा 280 राहणार नाही तर किमान 100 ते 110 जागांची घसरगुंडी होऊन त्या 170 पर्यंत खाली येतील असे भाकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्तविले आहे.

 

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकीचे निकाल बुधवारी आले. यात भाजपचा दारूण पराभव झाला. फुलपूर आणि अरिरिया लोकसभा मतदारसंघात तर भाजपचा 50 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला तर गोरखपूरची जागा 29 वर्षानंतर 22 हजार मतांनी गमावली. अखिलेश यादव, मायावती आणि लालूप्रसाद यांनी मोदी-शहांच्या भाजपला चांगलाच झटका दिला आहे. सध्या याची देशभर चर्चा असताना भाजपचा मित्रपक्ष असलेला, राहिलेल्या शिवसेनेने त्यांना झोडपण्याची संधी सोडली नाही. सामनात अग्रलेख लिहून उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

 

उद्धव ठाकरे 'सामना'च्या अग्रलेखात लिहतात, त्रिपुरा या छोटय़ा राज्यात भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. या विजयोन्मादाचा उत्सव सुरू असतानाच उत्तर प्रदेशातील दोन लोकसभा मतदारसंघांचे निकाल लागले आहेत व त्रिपुरा विजयाचे लाडू भसकन तोंडाबाहेर पडले आहेत. भाजपच्या तंबूत घबराट पसरवणारे हे निकाल आहेत. गोरखपूर व फुलपूर हे भाजपचे दोन मजबूत किल्ले समाजवादी पार्टीने उद्ध्वस्त केले आहेत. पोटनिवडणुका म्हणजे देशाची भावना नाही असे भाजपतर्फे सांगितले जाते; पण मोदी हे सत्तेवर आल्यापासून 10 लोकसभा पोटनिवडणुका झाल्या व त्यातील 9 जागांवर भाजपचा पराभव झाला. भाजप मोदी व शहा यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ सर्व पोटनिवडणुका हरला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान व आता उत्तर प्रदेश या राज्यांत भारतीय जनता पक्षाचीच सरकारे आहेत. मोदी हे प्रचंड लोकप्रिय असतानाही किल्ले का ढासळले? 2014 साली मोदी लोकप्रियतेची प्रचंड लाट उसळून जनतेच्या नाकातोंडात पाणी गेले व त्या लाटेत अनेक ओंडकेही विजयाच्या किनाऱ्यावर लागले; पण नाकातोंडातले व डोळ्यातले पाणी आता निघून गेले व लोकांना स्वच्छ दिसू लागले आहे, असे सांगत मोदींच्या सत्तेचा अंत होणार असल्याचे भाकीत केले आहे. 

 

पुढे स्लाईडद्वारे आणखी वाचा, उद्धव ठाकरे यांनी कसा हल्लाबोल केला भाजपवर......

बातम्या आणखी आहेत...