आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सफाई कामगारांच्या परीक्षेत विचारले IAS चे प्रश्न; आमदार भाई गिरकरांकडून कारवाईची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सफाई कामगारांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमधील प्रश्नपत्रिकेत विचारलेले अत्यंत कठीण प्रश्न उच्च शिक्षितांनाही सोडवता येणार नाहीत असे होते. या प्रकरणी भाजपचे आमदार भाई गिरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. गिरकरांनी विधानपरिषदेत यासंबंधी प्रश्न विचारला होता.

 

 

मुंबई महापालिकेच्या सफाई कामगार भरती परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या प्रकरणी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापतींनी विधानपरिषदेत निर्देश दिले आहेत. दहावी पास अशी शिक्षणाची अट असलेल्या 1388 सफाई कामगारांच्या जागांसाठी मुंबई महापालिकेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी सफाई कामगार पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांनी आपली अक्कल गहाण ठेवली होती की काय? असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहे.

 

 

पुढील स्लाईडवर या परिक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न...